वळण/गोविंद फुणगे मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शासन वेळोवेळी जनजागृती करत असते परंतु आज मतद...
वळण/गोविंद फुणगे
मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शासन वेळोवेळी जनजागृती करत असते परंतु आज मतदान करण्यासाठी एक मतदाराने चक्क बारामती ते वळण असा १८० किमी सायकलवर प्रवास करत आपले गाव गाठत एक अनोखा विक्रमच केला आहे.विजय भाऊसाहेब बनकर असं या तरूणाचे नाव असुन त्यांचे गावात आगमन होताच गावक-यांनी देखील त्यांचा सत्कार करूण त्यांचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्रामधे सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू असुन आज १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतेक मताला हे अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळे प्रत्येक मत घडवुन आणण्यासाठी उमेदवार हे शर्तिचे प्रयत्न करत असतात.गावाबाहेरील मतदारांना गावात आणण्याची स्वतंञ व्यवस्था करण्यात येते असते पण आपले कर्तव्य बजावण्यासाठी एक ध्येयवेडा तरूण चच्क सायकलिंग करत आल्याने त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे. राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. आणि हेच कर्तव्य पार पाडण्यासाठी वळण येथील विजय बनकर यांनी थेट बारामतीवरून बारा तासात सायकलिंग करत त्यांनी गाव गाठले आहे नोकरी निमीत्त ते बारामती येथे वास्तव्यात असतत.त्यांना सायकलिंग करण्याची प्रचंड आवड आहे.ते दैंनदिन सायकलिंग करत असतात.त्यांना आपण जेथे नोकरी करतो तेथुन आपल्या गावी सायकलिंग करत जाण्याची इच्छा होती.पण १५ जानेवारी रोजी मतदानाचा दिवस आणि १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा दिवस असल्याने घरी असलेल्या आईचे तीळ घेण्यासाठी त्यांनी हा दिवस निवडला आणि सकाळी ७ वाजता आपल्या बारामतील घरातुन सायकलवर प्रवास सुरू केला तर सध्यांकाळी ७ वाजता त्यांनी वळण गाव गाठले केवळ बारा तासात बारामतीहुन तब्बल १८० कि.मी.प्रवास त्यांनी पार केल्याने गावक-यांनी देखील त्यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत आहे.
मतदान हा आपला हक्क असताना अनेक नागरिक छोट्या कारणावरून मतदार करण्याचं टाळतात परंतु विजय बनकर यांनी सायकलवर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १८० किमी प्रवास करून मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत