राहूरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतसाठी मतदान सुरू, वळणला मोठा पोलीस बंदोबस्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतसाठी मतदान सुरू, वळणला मोठा पोलीस बंदोबस्त

  वळण(गोविंद फुणगे)    रा हुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्र ...

 वळण(गोविंद फुणगे)

  

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून वळण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गावात व मतदान केंद्राच्या परीसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन सकाळपासून मतदान प्रक्रिया हि शांततेत सुरु आहे.


    वळण ग्रामपंचायतीसाठी ११ जागेकरीता चार प्रभागामधुन २२ उमेद्वार आपले नशिब अजमावत आहेत तर एकुन २३३० मतदार आहेत.आज सायंकाळी या २२ ऊमेद्वारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळ पासुन शाततेत मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाच्या एक दिवस आधीच्या राञी उमेद्वाराने मतदाराला प्रभोलन दाखवु नये म्हणुन राञभर भरारी पथके गस्त घालत होते.तर आज दिवसभर देखील हि भरारी पथके कार्यरत असणार असल्याची चर्चा आहे.

पोलिस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील,आय्युब शेख,डावखर,सहा होमगार्ड तर राज्य राखीव दलाची पोलिस तुकडी देखील दाखल होणार आहे.

निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून दिपक अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० कर्मचारी काम पहात आहे.हि निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पाडा तसेच कायद्याचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत