स्वातीताई मोराळे यांची ऊसतोड महिलांच्या कोपीवर मकरसंक्रांत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वातीताई मोराळे यांची ऊसतोड महिलांच्या कोपीवर मकरसंक्रांत

 पुणे(प्रतिनिधी)         ओबीसी फौंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी याही वर्षी आपली संक्रात ऊसतोड महिला कामगारांसोबत ...

 पुणे(प्रतिनिधी)

        ओबीसी फौंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी याही वर्षी आपली संक्रात ऊसतोड महिला कामगारांसोबत साखर कारखान्यावरील कोपीवर साजरी केली. सामाजिक बांधिलकी दाखवत मागील पाच वर्षा पासून त्या हा उपक्रम राबवत आहे. यावर्षी त्यांनी विघ्नेश्वर सह. साखर कारखाना, ओझर ता. जुन्नर जि. पुणे येथे हा उपक्रम राबवला.

        स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना दैवत मानणाऱ्या स्वातीताई त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. स्व. मुंडेसाहेब वंचित, पीडित, गोरगरीब भटक्या व ऊसतोड कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत होते. त्यांच्या अकस्मित निधणानंतर ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

       ऊसतोड महिलांना टॉयलेट, बाथरूम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्या काम करत आहेत. यासाठी त्यांनी आज चेअरमन मा. सत्यशील शेरकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी ही त्यांनी चर्चा केली.

     यावेळी शशिकांत डोके , प्रिया शिंगोटे , हनुमंत जंगम , नवनाथ कबाडी , सुभाष डोके , रूपेश वाणी , विकास गडगे, ओतूर चे आरोग्य अधिकारी किरण मोराळे, सुनिल साळुंके, हवालदार जगन मुंडे या जुन्नर च्या टीमने अतिशय सुंदर नियोजन केले होते. स्वातीताई यांच्यासोबत ओबीसी फौंडेशन इंडियाच्या सहसचिव अलका दगडखैर व प्रवक्ते रत्नाकर मोराळे प्रदेशाध्यक्ष शैला वायभसे हेही उपस्थित होते. हा उपक्रम पुणे सह सोलापूर, बीड औरंगाबाद लातूर व बीड जिल्हातील साखर कारखान्यावर ही राबवला असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत