वळण/गोविंद फुणगे राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदान होत असुन सक...
वळण/गोविंद फुणगे
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदान होत असुन सकाळपासून उत्स्फूर्तपणे मतदार आपला मतदाचा हक्क बजावत आहे.तर दुसरीकडे माञ येथील वयोवृद्ध प्रल्हाद माधव आढाव यांनी आपल्या वयाच्या ८८ व्या वर्षात देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्रल्हाद आढाव हे वयोवृद्ध असल्याने चारचाकी गाडीतून त्यांनी मतदान केंद्र गाठले. बुथ प्रमुख यांनी सदर मतदारास सहकार्य करून हे मतदान घडवुन आनले.ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतेक मताला हे अनन्य साधारण महत्व असते त्यामुळे प्रत्येक मत घडवून आणण्यासाठी उमेदवारांचे शर्तिचे प्रयत्न सुरू असतात परंतु आढाव हे वयोवृद्ध असुन देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदान न करणा-यांना तरूणांनी त्यांचा आदर्श घेण्याची खरी गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत