सचिन गुलदगड यांची मानव संरक्षण समितीवर निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सचिन गुलदगड यांची मानव संरक्षण समितीवर निवड

  राहूरी(वेबटीम)  मानव संरक्षण समिती (नवी दिल्ली) चे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष  विजय कुराडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता माळी युवक...

 राहूरी(वेबटीम)

 मानव संरक्षण समिती (नवी दिल्ली) चे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष  विजय कुराडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची नुकतीच महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, कर्नाटक राज्याच्या जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

     यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी माधुरीताई उदावंत, महाराष्ट्र गोवा कर्नाटक जनसंपर्क अधिकारी गजानन भगत, श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर नाशिक जिल्हा संघटक संपत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले, मानव संरक्षण समितीच्या जनसंपर्क अधिकारी या नात्याने मी मानव संरक्षण समितीचे कार्य जनसामान्य पर्यंत पोहचविणार व त्यांच्या समस्यांचे निवारण करणार तसेच महाराष्ट्र राज्यात समितीचा विस्तार करण्यासाठी चांगल्या भूमिका घेईल, असे गुलदगड यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत