कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे सर ...
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे सर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजभूषण या पुरस्काराने ह. भ.प निवृत्ती महाराज देशमुख व खा.सदाशिव लोखंडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.त्यांचा या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थाप्रमुख परशराम साबळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कोपरगाव तालुका अध्यक्ष मनीष जाधव, कोपरगाव शहर उपाध्यक्ष स्वप्निल कोपरे, तालुका सचिव विनोद जवरे,तालुका सह सचिव विजय कापसे ,तालुका सह-सचिव अक्षय काळे, संघटक रविद्र जगताप, तर सदस्य मधुकर वक्ते आदी पत्रकारांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र भोस यांच्या जयंतीनिमित्त नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
या सत्काराला उत्तर देतांना साबळे यांनी पत्रकार संघाचे आभार मानत संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहे. तर काहींनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला आहे. याचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो. तसेच या पुढे देखील संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कार्य असेच सुरू राहिल अशी ग्वाही दिली.
यावेळी तालुका संघटक रविंद्र जगताप यांनी साबळे सरांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे अध्यक्ष मनीष जाधव यांनी साबळे सर त्याच्या संस्थेच्या माध्यमातून करत असलेल्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा
देत नुकताच समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघाच्या वतीने अभिनंदन केले व संस्थेने सुरू केलेल्या पत्रकारांचा दृष्टीने महत्वाचे असलेले भारत सरकार मान्यता प्राप्त पत्रकारिता क्षेत्रातील विविध कोर्सेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास रेखा दिवे, निलेश देवकर, पदम थापा, सुनील गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय कापसे यांनी तर आभार पत्रकार रवी जगताप यांनी मांडले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत