आंबी(संदीप पाळंदे) राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंमळनेर ग्रामपंचायतिची निवडणूक चुरशीची झाली. यामध्ये गावक...
आंबी(संदीप पाळंदे)
राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंमळनेर ग्रामपंचायतिची निवडणूक चुरशीची झाली. यामध्ये गावकरी मंडळाने निवडणूक झालेल्या तीन जागांवर घवघवीत यश संपादन करून विजयश्री खेचून आणली. याआधी सर्व संमतीने सात पैकी चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अंमळनेरचे सर्वेसर्वा सतिष जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या निवडणुकीत गावकरी मंडळाचे प्रभाग तीन मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून माजी सरपंच रोहण सुरेश जाधव, अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रिती रविंद्र पाळंदे तर प्रभाग एक मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात नंदकुमार लक्ष्मण जाधव हे विजयी झाले.
विजयी उमेदवारांचे अच्युतराव जाधव, रायभान जाधव, म्हसुजी साळुंके, पोलिस पाटील सुरेश जाधव, मच्छिंद्र जाधव, प्रमोद जाधव, रामनारायण जाधव, मनोहर साळुंके, विष्णू जाधव, लक्ष्मण साळुंके, विजयकुमार जाधव, अशोकराव जाधव, विठ्ठल जाधव, विनायक जाधव,रमेश काका जाधव पंढरीनाथ जाधव, गणेश जाधव, सोमनाथ जाधव, नारायण जाधव, बाळकृष्ण जाधव, महेश साळुंके, पोपट पाळंदे, रविंद पाळंदे, अनिल पाळंदे, दिपक बागुल, योगेश जाधव, आतिष जाधव, राहुल जाधव,पोपट पाळंदे यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत