डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील व्यासपीठाची दुरूस्ती करा.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील व्यासपीठाची दुरूस्ती करा..

कोपरगाव प्रतिनिधी   कोपरगाव शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील व्यासपीठ दुर्देवी अवस्थेत आले असुन त्यांची दुरूस्ती करण्यात यावी.त्याच ...

कोपरगाव प्रतिनिधी 

 कोपरगाव शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील व्यासपीठ दुर्देवी अवस्थेत आले असुन त्यांची दुरूस्ती करण्यात यावी.त्याच बरोबर या व्यासपीठाची उंची वाढवावी.अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी चे अनुसूचीत जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिर्हाडे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना  दिले आहे.

 या मैदानावर अनेक मोठ्या राजकीय, धार्मिक, सामाजिक संघटनांच्या सभा कार्यक्रम होत असतात.शहरातील मध्यभागी असलेले एकमेव असे व्यासपीठ म्हणून या मैदानाची ख्याती समजली जाते.सध्या या व्यासपीठाची अवस्था दुर्देवी झाली असुन त्याची दुरूस्ती करावी यासाठी नुकतेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे .

या निवेदनावर अभिषेक पवार गोरख वाडिले.अक्षय उदावंत,सुनिल वाहुळकर,दीपक घोडे,देविदास पवार सोमनाथ ताकवले,रोहिदास पाखरे,दशरथ श्रावण, दिपक पुडे. आदिच्या सहया आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत