कोपरगाव(वेबटीम) अनेक वर्षे कोल्हे परिवाराची सेवा करून नगराध्यक्षपद उपभोगून त्यांना टांग मारणारे आता नगरपरिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ.आश...
कोपरगाव(वेबटीम)
अनेक वर्षे कोल्हे परिवाराची सेवा करून नगराध्यक्षपद उपभोगून त्यांना टांग मारणारे आता नगरपरिषद निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ.आशुतोषजी काळे यांची आरती ओवाळायचा लागले असल्याची टीका माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी केली आहे.
विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू आहे. वहाडणे यांच्यावर पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून बोलताना विजय वहाडणे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी म्हंटले की, आ.आशुतोषजी काळे यांनी पाणी विषयावर धरणे आंदोलन केले त्यावेळी हे महाशय गायब होते.आताच राष्ट्रवादी काँग्रेसने धरणे धरून कोल्हे गटाने नामंजूर केलेल्या विकास कामांचा विषय जनतेसमोर मांडला.यावेळीही अति जागरूक श्री.मंगेशजी पाटील यांनी दांडी मारली.माजी आ.कोल्हे यांनी नगरपरिषदेला निधी मिळू दिला नाही,रस्त्यांची धूळधाण झाली तेंव्हा मंगेशजी का गप्प होते, येसगाव पाणी चोरी उघड करण्याचे धाडस श्री.विजय वहाडणे यांनी दाखविले.श्री.वहाडणे यांनी रस्ते खराब होऊ नयेत म्हणून इंदिरा पथ येथे स्वतः उभे राहून वाळुचे डंपर अडविले.तेंव्हा तुम्ही काय करत होते.अनेक वर्षांपासून झोपी गेलेले तुम्ही आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अचानक जागे झालेले आहात,हे जनतेला दिसतंय.
नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांनी जनतेसाठी 40 वर्षांत अनेक आंदोलने केली,सतत संघर्ष केला,तुरुंगात गेले. पण मंगेशजी तुम्ही जनतेसाठी किती वेळा संघर्ष केला हे जरा सांगाल का?जनतेसाठी प्रस्थापितांशी संघर्ष करायचे धाडस फक्त श्री.वहाडणेच करू शकतात.
विधानसभा निवडणुक ही प्रस्थापितांच्या मनमानी विरोधात लढविली होती.नेत्यांच्या पुढेपुढे करून पदांचे तुकडे त्यांनी कधीच मिळविले नाहीत.
५ नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी श्री.विजयराव वहाडणे यांनी नोव्हेंबर २०१८ ला दिल्ली येथे जाऊन ना.नितीनजी गडकरी यांना भेटून समृद्धी महामार्ग (गायत्री च्या)माध्यमातून खोदकाम सुरू केले.पण नंतर ते बंद पाडले गेले.ते पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीने धरणे आंदोलन केले,त्यावेळीही तुम्ही नव्हते.कोल्हे यांच्याविरोधात तुम्ही " ब्र " शब्दही काढू शकत नाही.आ.आशुतोषजी काळे व नगरसेवक मला साथ देत असतांना,कोल्हे गटाशी संघर्ष करत असतांना तुम्ही मेसेज-वाढदिवस-फोटो यातच मग्न आहात. तुम्हाला वाटत असलेला शहराचा कळवळा खरा आहे तर तुम्ही नगरपरिषदेत येऊन का चर्चा केली नाही.एक महिन्यात शहर धुळमुक्त करण्याची आयडिया का सांगितली नाही. हा कळवळा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच आहे. तुमच्यात हिंमत असेल तर कोल्हे यांच्याविरुद्ध एखादी बातमी द्यायचे धाडस दाखवा.
निधीची कमतरता असूनही सर्व प्रभागात प्रचंड कामे झालेली आहेत,होत आहेत. आता प्रमुख रस्ते व्हायचे तर कोल्हे गटाची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यांच्या मुजोरीला, मनमनीला नगराध्यक्ष तोंड देत आहेत. तुम्ही फक्त प्रसिद्धीच्या मागे आहात. तुमच्याकडे खरे तर राज्याचा कारभार द्यायला पाहिजे.करायचे काहीच नाही-शहरात फक्त स्वतःलाच जास्त कळते या आविर्भावात मोबाईलमध्ये बोटे घालून-मेसेज पाठवून जनतेला वैतागून टाकायचे बंद करा. कधीकोल्हे तर कधी काळे यांच्या आरत्या करून पदे मिळवण्यासाठी धडपडू नका.श्री.संजयजी काळे यांच्या सुचना-टिका मान्य होतात,कारण त्यांना राजकिय स्वार्थ नाही.ते नेत्यांच्या आरत्या ओवाळत नाहीत,म्हणून जनतेत आदर आहे.ते फक्त पोपटपंची न करता वर्षानुवर्षे निःस्वार्थ सेवा करतात.तसे तुम्ही असता तर तुमचेही महत्व वाढले असते असे संजय कांबळे यांनी म्हंटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत