किती अडथळे आले तरी कोपरगावचा विकास होणार – नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किती अडथळे आले तरी कोपरगावचा विकास होणार – नगराध्यक्ष वहाडणे

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगावचे राजकीय वातावरण अजून तापले असून श्रेयवाद आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. विकास कामांचे विषय नामंजूराव...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगावचे राजकीय वातावरण अजून तापले असून श्रेयवाद आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. विकास कामांचे विषय नामंजूराविषयी राष्ट्रवादीच्या लाक्षणिक उपोषणा नंतर त्याला उत्तर म्हणून भाजप व शिवसेनेने पत्रकार परिषद घेत कामाचे विषय का नामंजूर केले ? याचा खुलासा करत काळे गट व नगराध्यक्षावर अनेक आरोप केले होते.याला प्रत्युत्तर म्हणून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत कोल्हे गटाने केलेल्या आरोपाला रोखठोक शैलीत उत्तर दिले आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की, १२ जानेवारी रोजी कोपरगाव नगरपालिका मध्ये सर्वसाधारण मीटिंग पार पडली यावेळी 28 कामा पैकी 12 कामे जी तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण होती म्हणून तिला मंजुरी देण्यात आली. उर्वरित 16 कामाच्या निविदेत काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे ती कामे स्थायी समिती पुढे ठेवण्यात आले नाही. ती ही कामे लवकर होणार असून त्यात कोणताही दुजाभाव केलेला नाही.

पुढे ते म्हणाले की,कोल्हेंच्या आदेशामुळे विकास कामाच्या निविदा नामंजुर करण्यात आल्या असून या सर्वसाधारण सभेच्या वेळी संजीवनीचे दोन दूत दरवाजाच्या बाहेर मागे उभे होते म्हणून उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी जोरात आरडा ओरड करत विषय नामंजूर केले. हा फक्त शाबासकी मिळण्याचा खटाटोप होता.

माझी,काळे गट आणि मुख्याधिकारी यांची सहमती एक्सप्रेस जोरात असल्यामुळे कोपरगाव शहरात विकासकामे जोरात होत असून फक्त विकास कामासाठी ही सहमती एक्सप्रेस आहे. आमदार आशुतोष काळे यांचे सहकार्य असल्यामुळे विकास कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे सर्व प्रभागात कमीत कमी दीड कोटीची कामे सुरू असून यात कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे प्रमाण अधिक आहे. कोपरगाव नगरपालिका ज्या ठेकेदाराना काम देते त्या ठेकेदारांमध्ये 90% ठेकेदार यांनचे आहे. ते ठेकेदार कोणाचे आहे आणि ते कोणाला भागीदार हे सर्वांना माहीत आहे.

मागील मुख्याधिकारी यांच्यावर कोल्हे गटाचा दबाव असल्यामुळे त्यांनी मला सहकार्य केले नाही.कोपरगाव शहरासाठी आलेला निधी हा फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्यासाठी नसून जनतेच्या आणि शहर विकास कामासाठीच तो खर्च केले जात आहे. फिक्स मधील पैसे सर्व प्रभागातील विकास कामासाठी वापरले जात आहे.

प्रत्येक विकास कामात कोल्हे आणि कोल्हेगट अडथळा आणत असून यामुळे पहिले नगराध्यक्ष पद गेले, मला विरोध म्हणून आमदार पद गेले आणि असाच विरोध राहिला तर येणारे नगराध्यक्षपद जाईल.असा टोला त्यांनी कोल्हे आणि कोल्हे गटाला लगावला.

आमदार आशुतोष काळे यांचे विकास कामासाठी सहकार्य असल्यामुळेच आपण त्यांना प्रत्येक उद्घाटनप्रसंगी बोलवतो.अतिक्रमण करणारे,अनेक वर्ष नगरपरिषदेत लूट करणारे विस्थापितांना वेड्यात काढणारी, ठेकेदाराला पुढे करून पडद्यामागून कामे करणारे, पाणी योजनेच्या ठेकेदाराला सतत पैशाची मागणी करणारे ,पूर्वी शहराला 23 दिवसाआड पाणी देणारेच आज माझ्यावर आरोप करत आहे हीच मोठी शोकांतिका असल्याचे म्हणत जे विकास कामाला अडथळे आणतात ते आणणाऱ्याला जनता सत्तेत घेणार नाही. कोपरगावच्या विकासात किती अडथळे आले तरी कोपरगावचा विकास होणार आहे.

तसेच थोड्या दिवसात परत राहिलेले कामाच्या विषयाची तांत्रिक पूर्तता करून ती कामे सर्वसाधारण सभेत मंजूर केली जाईल , ते पुन्हा नामंजुर झाले तर जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेतली जाईल. कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागात किती रुपयांची कामे झाली याची सविस्तर आकडेवारी पुढील पत्रकार परिषदेत दिली जाईल अशी माहिती विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत