कोपरगावातील खराब रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे तर धुळीमुळे श्वसनाचे आजार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील खराब रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे तर धुळीमुळे श्वसनाचे आजार

  कोपरगाव(वेबटीम)     कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अनेकांना मणक्याचे तर धुळीच्या साम्राज्यामुळे  धुळीचे आजार जडले असू...

 कोपरगाव(वेबटीम)

    कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अनेकांना मणक्याचे तर धुळीच्या साम्राज्यामुळे  धुळीचे आजार जडले असून मूलभूत प्रश्न सोडविण्यास नगरपालिका अपयशी ठरत असल्याने जातीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी केले.  


पुढे बोलताना मंगेशराव पाटील म्हणाले की, आज शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश केला असता प्रत्येक रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य धुळीमुळे डोळ्यांचे आजार श्वसन विकार मणक्यांचे आजार खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे होणारे नुकसान यामुळे जनता पुरती वैतागली आहे. नगरपालिकेला विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे रस्त्यांच्या निविदा ही काढले आहेत मात्र निष्क्रिय नियोजन असल्यामुळे रस्ते होण्यास तयार नाहीत रस्त्याच्या बाजूला महिनोमहिने पडलेली खडीचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे .नगराध्यक्ष वहाडणे सांगतात निविदा निघाले आहेत लवकरच कामाला सुरुवात होईल मग कामे काढली असा सवाल करून प्रशासन व अधिकार यात ताळमेळ नाही काय पैसे असतांना देखील रस्ते का होत नाही रस्ते जर चांगले झाले. तर शहराचा कायापालट होऊन व्यापारवृद्धी निश्चितपणे होऊ शकेल मात्र नगरपालिका आहे जाणून बुजून करत नसल्याचा आरोप पाटील यांनी करून रस्त्यावर टॅंकरद्वारे पाणी मारण्यात येते मात्र ती तात्पुरती मलमपट्टी आहे. रस्त्यावर पाणी मारू नये असे आपले परखड मत असून दरवर्षी डांबरीकरण आने रस्ते तयार करावे त्याचे टेंडर काढावे हे सर्व शक्य आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे नद्या तुडुंब भरलेले आहेत. असे असतानाही नगरपालिका सात दिवसात हिवाळ्यातच पाणीपुरवठा करीत आहेत तरी नागरिकही का गप्प बसले आहेत. 


नागरिकांना आरोग्य रस्ते व पाणी या आवश्यक बाबी असताना यावरच भर दिला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल गोदावरी लहान पूल ओलांडला व मुख्य रस्त्यावरून थेट साईबाबा चौफुली पर्यंत जायचे झाले तरी मोठे स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहनांमुळे उडणारी धूळ असेच काही चित्र निवारा रोड गांधिनगर बैल बाजार गुरुद्वारा रोड इंदिरा पथ धारणगाव रोड व इतर रस्तेही तूट झालेले आहेत त्यातच खाजगी दूरसंचार वाहिन्यांच्या खोदाईमुळे आहे .ते रस्ते खराब होत आहेत या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही अथवा नगरपालिका प्रशासन त्याबाबत तातडीने पावले उचलण्यास धजत नाही सर्वसामान्य नागरिक घरपट्टी पाणीपट्टी शैक्षणिक तसेच झाडे लावण्या संदर्भात कररूपाने पैसा भरतो मात्र त्याचा विनियोग चांगला होत नसल्याचे दिसत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात मात्र रस्ते व इतर गल्लीबोळात धाडतांना सदरची धूळ ही आजूबाजूला लावून देण्यात येते की धूळ दररोज उचलली लांब नेऊन टाकली तर धुळीच्या प्रमाणात बराचसा फरक पडू शकेल नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही श्री पाटील यांनी केली.


 मी काही महिने नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आहे त्यामुळे मला या प्रश्नांची जाण आहे त्यामुळेच मी पालिका प्रशासनाला याप्रश्नी जबाबदार धरीत असून सामाजिकदृष्टिकोन ठेवून कोणतेही राजकारण न करता मीही मागणी करीत आहे. नेत्यांनी त्यांच्या परीने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचा विनियोग चांगली कामे करून दाखवण्यात घालवावा असा सल्लाही श्री पाटील यांनी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत