देशातील पहिल्या २५ खासदारांत खा.सदाशिव लोखंडे यांचा समावेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देशातील पहिल्या २५ खासदारांत खा.सदाशिव लोखंडे यांचा समावेश

शिर्डी(वेबटीम)  कोविड महामारी सुरू असताना,आपापल्या मतदारसंघात वैद्यकीय मदतकार्यात अग्रेसर असलेल्या देशपातळीवरील पहिल्या २५ खासदारांत शिर्डी ...

शिर्डी(वेबटीम)


 कोविड महामारी सुरू असताना,आपापल्या मतदारसंघात वैद्यकीय मदतकार्यात अग्रेसर असलेल्या देशपातळीवरील पहिल्या २५ खासदारांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सदाशिव लोखंडे , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबर-२०२०मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली. केंद्र सरकारच्या गव्हर्न आय यंत्रणेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी देशभरातील खासदारांकडून यावावतची माहिती ऑनलाइनद्वारे संकलित करण्यात आली. 

याबाबत खासदार लोखंडे म्हणाले, की शिडी लोकसभा मतदारसंघात ७० प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत. ऑक्टोबरमध्ये कोविड ऐन भरात असताना, लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. या प्रतिकूल काळात सरकारी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व आशा सेविका ही मंडळी कोरोनायोद्धा या नात्याने पुढेआली. या कोरोना योद्ध्यांना कुठलीही कमतरता भासू नये, याकडे आपण जाणीवपूर्णक लक्ष दिले. प्रत्येक आरोग्य केंद्रास २०० पोपीई कीट, ४०० मास्क व सॅनिटायझर पुरवले. त्यासाठी साई खेमानंद फाउंडेशनने मदत केली.जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत दोन बैठका घेऊन मतदारसंघातील कोविड नियंत्रण मोहिमेचा आढावा घेतला. त्यातील त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले.सर्व कोविड सेंटरना सातत्याने भेटी दिल्या. तालुका पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आढावा घेतला, असे लोखंडे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत