देवळाली प्रवरा (प्रतिनिधी ) राहूरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाक्यावर काहींनी एका ३१ वर्षीय तरुणाच्या डोक्यात टणक वस्तू मारून जखमी...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी )
राहूरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाक्यावर काहींनी एका ३१ वर्षीय तरुणाच्या डोक्यात टणक वस्तू मारून जखमी केले. याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक अशोक सांगळे(वय-३०,रा.राहूरी फॅक्टरी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हॉटेल सिरवीच्या समोर लोकांची गर्दी पाहून सदर ठिकाणी गेलो असता कोणीतरी अनोळखी इसमाने त्याचे पाठीमागून डोक्यात काहीतरी टनक वस्तूचा फटका मारला. त्यामुळे मी खाली पडलो डोक्यात जबर मार लागला. त्यावेळी तेथील ५ ते ६ अनोळखी इसमाने शिवीगाळ करून लाथाबुक्कानी मारहाण केली आहे. दरम्यान दीपक सांगळे याच्या फिर्यादिवरून राहूरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४८,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डि.के आव्हाड हे करीत आहे.
श्रीरामपूर नाका येथील गुन्हेगारी अड्डा पोलीस रोखणार का?
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका येथे दोन गटात हाणामारी, मद्यपींचा धिंगाणा, खुलेआम सुरू असलेला मटका व सोरट अड्ड्यावरील वादावादी रस्तालुटीचे सावज याच अड्ड्यावरुन शोधले जाते.आदी घटना या नित्याच्या बनल्या आहेत. या ठिकाणाहून आदिनाथ, गुरुकुल, समर्थनगर तसेच अन्य वसाहतींमध्ये जाणारे नागरिक ,महिला, विद्यार्थी यांना या गुन्हेगारीचा कायम त्रास सहन करावा लागत आहे. ताहाराबाद रोड लगतच असलेले एक स्वीट दुकान हे गुन्हेगार, अवैध धंद्यावाले तसेच टार्गट मुलांचे जणू काही संपर्क कार्यालयाच बनले आहे. या ठिकाणचे अवैध धंद्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यानी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत.माञ काही पोलिसच या अवैध धंद्यावाल्यांबरोबर राजरोसपणे बसलेले दिसतात त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत