कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अंत्यत गरजेचे असलेले विषय नगरपालिका बांधकाम समितीच्या विषय पत्रिकेवर घेऊन तातडीने मार्गी...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अंत्यत गरजेचे असलेले विषय नगरपालिका बांधकाम समितीच्या विषय पत्रिकेवर घेऊन तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगरसेवक संदीप वर्पे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली असता आज नगरपालिकेत बांधकाम समितीच्या पार पडलेल्या तीनही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनात संदीप वर्पे यांनी म्हंटले होते की, कोपरगाव शहरातील उर्दू शाळा क्रमांक ४ व शिक्षक मंडळाच्या इतर शाळांकरिता महिला शिक्षिका व विद्यार्थिनी करीता स्वंतत्र स्वच्छतागृह नसल्याने ते तातडीने बांधून मिळावेत तसेच माधवराव आढाव विद्यालय येथील(जुने सायन्स कॉलेज) येथे सरंक्षण भिंतीचे डागडुजीकरणं तातडीने करावे.
कोपरगाव शहरात दैनंदिन कामाकरिता अर्थात खरेदी,बाजारहट येणाऱ्या महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह बांधकाम करावे. अशी मागणी केली होती. दरम्यान या तीनही विषयांना बांधकाम समितीच्या सभेत मंजूर मिळाली आहे.त्यामुळे कोपरगाव येथील महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत