बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करावी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करावी

  कोपरगाव(वेबटीम) राज्याच्या विविध भागात अनेक पक्षी  अचानक मृत्यू मुखी पडत असल्याच्या अनेक घटना घडत असून बर्ड फ्लू सदृश्य परिस्थिती रोखण्या ...

 कोपरगाव(वेबटीम)

राज्याच्या विविध भागात अनेक पक्षी  अचानक मृत्यू मुखी पडत असल्याच्या अनेक घटना घडत असून बर्ड फ्लू सदृश्य परिस्थिती रोखण्या साठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी अनेक पोपट कावळे व कोंबड्या बगळे, चिमण्या या सारख्या पक्षांचे अचानक मृत्यू होत आहेत. बर्ड फ्लू सदृश आजाराने हे मृत्यू होत असून या बाबत अध्याप वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत आपल्या परिसरात अध्याप कोणत्याही घटना उघडकीस आल्या नसल्या तरी या करिता प्रशासनाने त्वरित लसीकरण व इतर आवश्यक उपाय योजना कराव्यात कोपरगाव शहरात देखील अनेक गल्ली बोळात देशी विदेशी चिकन विक्रीची दुकाने थाटलेली असून या ठिकाणी विविध जिल्ह्यातून व ग्रामीण भागातून कोंबड्या विक्री करण्यासाठी आणल्या जातात शहरातील अनेक चिकन शौकीन या ठिकाणी चिकन खरेदी साठी गर्दी करत असतात एन शहरात व मध्य वस्तीत गल्ली बोळात ही दुकाने असल्याने नागरिकांची सोय होत आहे, असे असले तरी नगरपालिका हद्दीत या कोंबड्यांची वैद्यकीय तपासणी करूनच विक्री करण्यात यावी असा नियम आहे त्या करिता नगर पालिकेकडून विशिष्ट फी वसूल केली जाते मात्र कोंबड्यांची अशा प्रकारे तपासणी होती किंवा नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे .असे असले तरी राज्यातील विविध भागात होणाऱ्या घटनांकडे पहाता कोपरगाव येथील प्रशासनाने या बाबत योग्य ती उपाय योजना करावी असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत