देवळाली प्रवरा प्रतिनिधी गणेगाव व वांबोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात ...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
गणेगाव व वांबोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणाऱ्यांना पोलिसांनी अडविले; पण कोणीच ऐकत नव्हते. अखेर दंगलनियंत्रण पथकाने थेट जमावावर हल्लाबोल केला. काठ्यांचा प्रहार होताच कार्यकर्त्यांना पळता भुई थोडी झाली. पथकाने घराघरांत घुसून, अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले. याप्रकरणी 20 जणांना अटक झाली. 50 जणांवर गुन्हे दाखल झाले. भाजप तालुकाध्यक्ष तथा गणेगावचे माजी सरपंच अमोल भनगडे तर जिल्हा परीषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
गणेगाव येथे भाजपने राष्ट्रवादीचा पराभव करीत सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळविला. हा विजय साजरा करण्यासाठी सायंकाळी उमेदवारांची जेसीबीवरून मिरवणूक निघाली. डीजेचा आवाज घुमला. जेसीबीवरून गुलालाची उधळण सुरू झाली. याबाबत पोलिसांना माहिती समजताच, तीन पोलिसांनी मिरवणूक बंद करण्याची विनंती केली; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेतले नाही. दंगलनियंञण पथकास पाचारण करण्यात आले.अंगावर गुलाल दिसला की पोलिसांनी चोपण्यास सुरवात केली.यात काही विरोधकांच्या अंगावर मुद्दामहुन गुलाल टाकला होता. त्यांनाही लाठीचा प्रसाद खावा लागला.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भिटे व अन्य ९ व्यक्तींनी वांबोरी ग्रामपंचायत निवडणूकितील विजयानंतर गुलाल उधळून फटाके फाडून जल्लोष साजरा केल्यामुळे राहूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांबोरी येथील नवनिर्वाचित सदस्य व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून एकञ येवुन विजयी उमेदवाराना वांबोरी दुरक्षेञ कार्यालय अशी फेरी काढुन गुलाल उधळुन फटाके फोडले यावरुन पो.हे.का. बन्हाटे यांच्या फिर्यादीवरुन 1) बाबासाहेब भिटे 2) नितीन बाफना 3) तुषार संभाजी मोरे 4) नवनाथ गवते 5) किसन जवरे 6) गोरख देवकर 7) स्वर कुसमुडे 8) गोरख ढवळे 9) प्रशांत नवले सर्व रा. वांबोरी ता राहुरी आदीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पो.काँ.सचिन सुरेश लोंढे यांच्या फिर्यादी वरुन 1-शिवाजी आप्पाजी कोळसे वय 55 वर्ष रा. गणेगाव 21 भगवान महाराज कोबरणे वय 21 वर्ष 3-दत्तात्रय बाळासाहेब कोबरणे 4-महेश बाबासाहेब कोबरणे 5-सोपान काशिनाथ माळी 6-आदिनाथ बापू कोबरणे 7-प्रदीप पोपट कोबरणे 8-महेश साहेबराव भनगडे 9-विकास सुरेश कोबरणे 10-बाबासाहेब काशिनाथ कोबरणे 11-बाळासाहेब भिकाजी कोबरणे 12-भाऊसाहेब सोन्याबापु कोबरणे 13-बाबासाहेब ज्ञानदेव कोबरणे 14-पोपट दामोदर कोबरणे 15-सतिश माणिकराव कोबरणे 16-दादा रघुनाथ लहूडे 17- सोन्याबापु सोपान कोबरणे 18-अमोल साहेबराव भनगडे 19-संदीप ज्ञानदेव मोरे सर्व रा.गणेगाव ता.राहुरी आदीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावबंदी आदेश असताना देखील यातील आरोपी मजकूर यांनी मद्य सेवन करून गैर कायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक रोडवर जेसीबी नंबर एम एच 17 बीएक्स 2601 हा रस्त्यावर आडवा लावून जेसीबी चे पुढील बकेटमध्ये भरलेला गुलाल उधळून व डीजे चालक याने विनापरवाना डीजे लावून मिरवणूक काढली.
याबाबत पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कळविले. त्यांनी ही बाब पोलिस अधीक्षकांच्या कानावर घातली. सूत्रे हलली. दंगलनियंत्रक पथकाचे एक उपनिरीक्षक व 27 जणांचे पथक चार वाहनांतून गावात दाखल झाले. त्याने थेट मिरवणुकीवर हल्लाबोल केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भानगडे यांच्यासह 20 जणांना राहुरी पोलिस ठाण्यात आणले. 50 जणांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत