राहाता(प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल या ठिकाणी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या ३२...
राहाता(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल या ठिकाणी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अभियानांतर्गत महामार्ग पोलिस केंद्र बाभळेश्वर यांच्यावतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायधनी सर हे होते यावेळी डॉ. श्री भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री संजय जाधव पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे परिक्षेत्र,श्री प्रितम यावलकर पोलिस उपअधीक्षक महामार्ग पोलीस सुरक्षा पथक पुणे, श्रीमती नंदिनी चानपूरकर पोलीस निरीक्षक अहमदनगर या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वाहन चालविताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे, वाहन परवाना महत्वाचा का आहे, वाहतुकीचे नियम काय आहेत, या विषयी माहिती देण्यात येऊन विद्यार्थ्यांना माहिती पत्रकाचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी महामार्ग पोलिस मदत केंद्र बाभळेश्वरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय तुपे,सहाय्यक फौजदर शेख,रोकडे,पोलिस हवालदार गायकवाड,मदने,अरण,पोलिस नाईक शिवाजी गाढे,दिगंबर शेलार,पोलिस शिपाई राठोड,डोईफोडे यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ घोडसरे मॅडम यांनी मानले .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत