देवळाली प्रवरा हद्दीतील इंग्रजी माध्यम शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याची मुजोरी वाढली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा हद्दीतील इंग्रजी माध्यम शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याची मुजोरी वाढली

देवळाली प्रवरा प्रतिनिधी     देवळाली प्रवरा हद्दीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी न भरणाऱ्या पालकांच...

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

  देवळाली प्रवरा हद्दीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी न भरणाऱ्या पालकांच्या हातात दाखले देण्यास सुरवात झाली आहे.पालकांना भ्रमणभाषवर संपर्क करुन शैक्षणिक संस्थेत बोलावून फि भरा नाही तर दाखला घेवून जा. पालकांनी थोडी मुदत मागितली असता संस्थेच्या प्राचार्या यांनी कार्यालयातून हकलवून लावले.त्या संस्थेच्या प्राचार्याची मुजोरी वाढली असून दोन वर्षापूर्वी टाकळीमियाँ येथील पालकांबरोबर असाच प्रकार घडला होता.


याबाबत राहुरी कारखाना येथील एका पालकाने पञकारांशी बोलताना म्हणाले की, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ज्यु.केजी मध्ये शिक्षण घेत आहेत. ज्यु.केजीच्या विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षण करणे अवघड जात आहे. त्यामुळे बाल वयातील विद्यार्थ्यांचे  आँनलाईन शिक्षण होत नाही.तरीही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीचा तगादा लावत आहे.ज्या पालकांनी शैक्षणिक फी भरली नाही. त्या पालकांना शैक्षणिक संस्थेत बोलावून पालकांना फी भरण्याचा तगादा करण्यात येत आहे. कार्यालयात पालकांना अपमनास्पद वागणूक देवून प्राचार्या यांनी अनेक पालकांना "गेटआऊट" (हकलावून) दिले आहे.याविरोधात अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

     याबाबत पालकाने शैक्षणिक संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यास भ्रमणभाषवर संपर्क साधुन प्राचार्या विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन जा सांगत आहे.त्या एकत नाही असे सांगितले असता त्या पदाधिकाऱ्याने प्राचार्य तुमच्या बापाची नोकर आहे का? असे बोलून पदाधिकाऱ्या कडून हि पालकांचा अपमानच केला आहे. या संस्थेच्या विरोधात पालकांनी एकञ येवून लढा उभरावा अशी मागणी काही पालकांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत