कोपरगावात लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन

  कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवण्याकरिता एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे ,अशी माहिती लोक स्वराज्...

 कोपरगाव(वेबटीम)

 कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवण्याकरिता एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे ,अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिली आहे.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात अँड.पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुक्यातील खालील समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी दि २६ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉपचे वाटप त्वरित सुरू करावे, कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यातील संभाव टंचाई दूर करण्यासाठी उपाय योजना करावी, कोपरगाव कोर्टाशेजारी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाची जागा परत घेऊन वकिलांना ऑफिस साठी गाळे व व्यापारी संकुल बांधण्यात यावे, कोपरगाव शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टी धारकांना त्वरित सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात यावे, कोपरगाव नगर पालिकेच्या मंजूर केलेल्या कामाची शासकीय अंदाज पत्रक तयार करून सदर कामास त्वरित सुरुवात करण्यात यावी ,कोपरगाव शहर व तालुक्यातील मटका जुगार,बेकायदेशीर दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावे ,कोरोना साथीच्या कालावधीतील सर्व शासकीय कर ,घरपट्टी, वीजबिल,शेतसारा कर माफ करण्यात यावेत.

     अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार तहसीलदार यांना दिलेलता निवेदनावर अँड.नितीन पोळ (प्रदेश अध्यक्ष)  सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे, सुजल चंदनशिव,बाळू पवार आदींच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत