राहुरी/गोविंद फुणगे राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर चिंचोली फाटा येथील हाॅटेल नंददिप येथे हायप्रोफाईल वैश्या व्यवसायावर पोल...
राहुरी/गोविंद फुणगे
राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर चिंचोली फाटा येथील हाॅटेल नंददिप येथे हायप्रोफाईल वैश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकल्याने तालुक्यासह जिल्ह्यात अवैध व्यवसायिकाची चांगलेच धाबे दणाणले आहेत.D.y.s.p.संदिप मिटके यांच्या पथकाची हि कारवाई केली असुन सदर कारवाईत दोन पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली आहे तर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली आहे.
आज दि. २९ जानेवारी रोजी D.y.s.p. संदीप मिटके यांनी चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधे छापा टाकला आहे.येथील हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे हा पिडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची खात्रीशिर बातमी पोलिसांना मिळाली होती.
त्यानूसार हॉटेल नंदादीपमधे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकला असता येथे दोन परप्रांतीय (बंगाली) महिलांची महिला आढळून आल्या सदर महिलांची सुटका केली असून हाॅटेलचालक आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस पोलिसांनी ताब्यात घेथले असुन आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली D.y.s.p संदीप मिटके , PI गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत