स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे काम समाजासाठी प्रेरणादायी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे काम समाजासाठी प्रेरणादायी

  घोडेगाव(वेबटीम)  डवरी गोसावी हा समाज भटका आहे . स्वतः भिक्षा मागुन उपजिविका करतात .शिक्षणापासुन समाजातील अनेक कुटुंब वंचीत आहेत . आपला समा...

 घोडेगाव(वेबटीम)

 डवरी गोसावी हा समाज भटका आहे . स्वतः भिक्षा मागुन उपजिविका करतात .शिक्षणापासुन समाजातील अनेक कुटुंब वंचीत आहेत . आपला समाज शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन काशिनाथ शेगर यांनी घोडेगाव येथे  श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून महात्मा फुले बाल संगोपन केंद्र चालु केले आज येथे पस्तीस मुले यांची रहाणे जेवण याची सोय केली आहे .स्वतः भिक्षा मागुन समाजातील मुलासाठी त्यांचेहे काम प्रेरणादायी असल्याचे  अंध श्रध्दा निर्मुलन समितीचे काँम्रेड बाबा आरगडे यांनी कोरोना योध्दा गौरव पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हटले .

  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाने दुपारी दोन वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.  नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा(कोरोना योध्दा) , सोनई सहा पो .नि. करपे(कोरोना योध्दा) ,दै लोकमतचे पत्रकार दिलीप शिंदे(समाज गौरव), अविनाश एळवंडे (कोरोना योध्दा), शिक्षक शिवराज तोंडे (समाज मित्र) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्तविकात अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.कार्यक्रमास सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सोनवणे, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र एळवंडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनवणे व राजेंद्र पाटोळे,  सिने अभिनेते सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, किशोर कदम,कामगार तलाठी भुतकर सह श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शंकर सावंत, अमोल चौगुले, शिवाजी सावंत, संतोष चौगुले, अधिक्षक सागर शिंदे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबाजी शेगर तर आभार मोहन शेगर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत