देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा मंजूर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा मंजूर

देवळाली प्रवरा(वेबटीम)  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी गुरुवारी सकाळी मंज...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

 देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी गुरुवारी सकाळी मंजूर करून मुख्याधिकारी अजित निकतं यांच्यामार्फत निवडणूक प्रकिया राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी ज्येष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांनी हा..ना...करता करता होकार दिला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन उपनगराध्यक्ष निवडीची शक्यता आहे.

  गेल्या आठवड्यात 'आवाज जनतेचा' या पोर्टलवर उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा घेतला.. या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती.प्रकाश संसारे यांनी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीच विना तारखेचा राजीनामा भाजप नेते माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याकडे दिलेला होता. नगराध्यक्ष सत्यजीत कदम , गटनेते सचिन ढुस यांनी चंद्रशेखर कदम यांची भेट घेऊन उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी मागणी केली. माजी आमदार कदम यांनी ३ महिन्यांपूर्वी  घेतलेला राजीनामा गटनेते ढुस यांच्याकडे विषय समितीची निवड प्रकिया पार पडल्यानंतर उपनगराध्यक्ष संसारे यांचा नगराध्यक्ष कदम यांच्यासमोर दाखल करण्यात आला. अखेर तो गुरुवार दि.२८ जानेवारी रोजी सकाळी नगराध्यक्ष कदम यांनी राजीनामा मंजूर केला असून मंजूर केलेला राजीनामा गटनेते मुख्याधिकारी अजित निकत यांच्यामार्फत पुढील निवडप्रकिया राबविण्यासाठी पाठविला आहे.या वृत्तास मुख्याधिकारी निकत यांनी दुजोरा दिला आहे.

 दरम्यान नवीन उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची याबाबत भरपूर चर्चा झाली.आण्णासाहेब चोथे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी सुरुवातीला त्यांचा होकार मिळत नव्हता.परंतु हा..ना..करता करता चोथे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी होकार दिला. 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन उपनगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. आण्णासाहेब चोथे यांच्या गळयात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचे समजत असले तरी आठ- दहा दिवसांच्या कालावधीत काही राजकीय खेळी खेळली गेल्यास चोथे यांच्या नावात बदल होऊ शकतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत