कोपरगाव(वेबटीम) कोपरगांव तालुक्यातील मौजे संवत्सर दशरथवाडी हददीतील जुना दहेगांव रोडचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन संबंधीत ...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगांव तालुक्यातील मौजे संवत्सर दशरथवाडी हददीतील जुना दहेगांव रोडचे डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन संबंधीत ठेकेदाराचे कुठलेही पेमेंट अदा करु नये त्याचबरोबर सदर रस्त्याचे झालेले कामकाजाची त्वरीत सखोल चौकशी करावी अशी मागणी संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे.
मौजे संवत्सर दशरथवाडी हददीतील जुना दहेगांव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सदर रस्त्यावरुन युवकांपासुन ते ज्येष्ठ नागरिक, शेतकरी मोठया संख्येने जाणे येणे असल्याने सदरच्या रस्त्याने मोठी वर्दळ असल्याने सदरचा रस्ता हा उच्च दर्जाचे होणे गरजेचे असतांना देखील तसे कुठेही झाले नाही, रस्त्याचे कामकाज सुरु असतांना प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदाराने त्याचा फायदा घेत सर्वनियम तोडुन रस्त्याचे कामपुर्ण होण्यापूर्वीच रस्त्याचे तेयेईन तेरा वाजल्याने सदरच्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा दर्जाचा नसल्याने ठेकेेदाराने केलेल्या कामावर अनेक प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कामकाजासाठी वापरण्यात येणा-या साहित्यावर सुध्दा ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असुन त्वरीत चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या विरुध्द उपोषण करण्यात येईल असा इशारा संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, ज्ञानेश्वर परजणे, नामदेव सोनवणे, रणजीत जगताप, मुकुंद काळे, संभाजी भाकरे, सिध्दार्थ भालेराव यांच्यासह जुना दहेगांव रोड परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. रस्त्याच्या कामकाजा बाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगांव, उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ल.पा. विभाग, ग्रामविकास अधिकारी संवत्सर ग्रामपंचायत यांनी निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत