देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) प्रभू श्रीराम मंदिर निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी देवळाली प्रवरा शहरात विव...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
प्रभू श्रीराम मंदिर निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ रोजी देवळाली प्रवरा शहरात विविध भागात निधी संकलन करण्यात आले.
देवळाली येथील श्रीरामपूर रोड पासून ते गुहा रोड,कोल्हार रोड गुहा शिव पर्यंत घरोघरी निधी संग्रह अभियान अंतर्गत फेरी काढण्यात आली.सर्वांनी गट,तट,राजकारण,जात पात विसरून प्रत्येक घरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मोठा निधी दिला.
यावेळी न्यासाचे निधी संकलन प्रतिनिधी यांनी पूर्ण परिसरात निधी संकलनाचे काम केले. निधी संकलनासाठी स्वयंसेवक येत असल्याचे माहिती मिळताच प्रभू रामचंद्रांची प्रतिमा असलेल्या रथाचे वाड्यावस्त्यांवर महिला भगिनींकडून औक्षण करुन स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी गुढ्या उभारून सडा रांगोळी काढून उत्साहात नागरिक आपापल्या परीने मंदिरासाठी निधी देत आहेत.
प्रभू रामचंद्रांच्या राष्ट्रमंदीराच्या उभारणीच्या निमित्ताने उद्या देवळाली प्रवरा शहरात धर्म जागरण दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीचा शुभारंभ लक्ष्मी नारायण मंदीर, सोसायटी डेपो येथून होणार आहे. सदर दिंडी मधे सर्व रामसेवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वयंसेवकांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत