कोपरगाव (वेबटीम) शहरातील बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचा सातवा वर्धापनदिन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात धार्मिक...
कोपरगाव (वेबटीम)
शहरातील बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचा सातवा वर्धापनदिन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात धार्मिक विधिवत कार्यक्रमाने संपन्न झाला.
या प्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत व टाळ्यांच्या कडकडाटात तसेच त्रिशरण पंचशील याचना व बुद्ध वंदना वंदना पठण करण्यात आले.यावेळी परिसरात मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरन निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दुशिंग यांनी केले व माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या कामाची माहिती दिली.
सदर कार्यक्रमा प्रसंगी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष राजू उशीरे, सल्लागार साहेबराव कोपरे,संजय कांबळे ,संजय दुशिंग, मनोज शिंदे, राहुल खंडिझोड ,रवींद्र धिवर, अविनाश शिंदे ,रवी धुळे, नितीन त्रिभुवन, नाना रनशूर ,नाना रोकडे, गौतम गायकवाड महेश दुशिंग ,भगवान खळे, राजू पगारे, किरण कासारे आदिसह कोअर कमिटीचे सर्व सदस्य व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत