वाळू वाहतुकीच्या बैठकीचा फार्स नेमका कशासाठी? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाळू वाहतुकीच्या बैठकीचा फार्स नेमका कशासाठी?

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून बोलावलेली बैठक वाळू ठेका हा शासकीय असून शहरातून वाहतूक होऊन द्यावी लागेल या निर्ण...

कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून बोलावलेली बैठक वाळू ठेका हा शासकीय असून शहरातून वाहतूक होऊन द्यावी लागेल या निर्णयावर पोहचली असून वाळू वाहतुकी विषय बोलावलेल्या बैठकीचा फार्स नेमका असा सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

मागील आठ दिवसांपूर्वी कोपरगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष यांनी वाळूची अवजड वाहने नगर पालिका हद्दीतून जाऊ देऊ नये यासाठी विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीस अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून लोक प्रिय नगराध्यक्ष यांच्या कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये, या मागणीस पाठिंबा दर्शवला व नगराध्यक्ष साहेब यांच्या  या निर्णयाचे स्वागत व यापूर्वी देखील त्यांनी वाळू वाहतूक होऊ नये म्हणून भूमिका घेतली होती वास्तविक या बैठकीस शहरातील नागरिकां बरोबरच पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचे देखील म्हणणे जाणून घेणे आवश्यक होते.

 मात्र नागरिकांच्या सूचना शिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या काही राजकीय पदाधिकारी यांनीच जास्त चर्चा घडवून आणली व कोपरगाव शहरातून वाहतूक होऊ देणार नसेल तर दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा अशी मागणी केली असल्याचे दिसून येते.

या सर्व चर्चेतून वाळूची जड वाहतूक नगर पालिका हद्दीतील रस्त्यावर होऊ न देण्या ऐवजी महसूल विभागाने रितसर लिलाव केलाच आहे तर आता योग्य वजन असलेले व कमी वेगाने वाळूची वाहने नगर पालिका हद्दीतून जाऊ द्यावे लागतील या निर्णयावर बैठक आली असेल आणि नागरिकांच्या सूचना व मागणीला काहीच किंमत नसेल तर या बैठकीचा फार्स नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे असेही पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत