वळण/गोविंद फुणगे डिपॉझिट पावती मोडल्याचा दिशाभूल करणारा आरोप विरोधकांकडुन आमच्यावर सातत्याने होत आहे पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत...
वळण/गोविंद फुणगे
डिपॉझिट पावती मोडल्याचा दिशाभूल करणारा आरोप विरोधकांकडुन आमच्यावर सातत्याने होत आहे पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत एकही रूपयाचा गैरव्यवहार हा आमच्याकडून झालेला नाही.ग्रामपंचायमधे तत्कालीन कर्मचारी प्रल्हाद कार्ले यांचे अपघाती निधन झाले होते.ती केस न्यायालयात सुरू होती. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने ३ लाख ७५ हजार रुपये हे मयताच्या वारसाला अदा करावे लागले होते.परंतू आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवुन विरोधकांनी बिनबुडाचे आरोप सुरू केले असल्याचे जनसेवा मंडळाचे दत्तात्रय खुळे, ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पञकात म्हटलंय आहे.
प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हटले की,गावातील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरण्याचा आरोप आमच्यावर झाला मात्र परिवर्तन मंडळाच्याच एका उमेदवारांने ओढ्यावर अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे ओढ्याची रूंदी कमी झाली असल्यानेच खर तर झोपडपट्टीत पाणी शिरले होते.तरीही त्यावेळेस जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचे मार्ग आम्ही तत्परतेने मोकळा केला होता माञ आता तशी वेळ येणार नाही याची आम्ही पुर्ण दक्षाता घेऊ तसेच गावातील संपूर्ण गटारींचे काम झाले असुन उर्वरित कामे देखील पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू आहे.तर विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देत खुळे यांनी म्हटले की, एकाही ग्रामसभेला हजर नसलेल्यांनी आम्ही किती ग्रामसभा घेतल्या याचा हिशोब मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही तसेच आमच्या काळात रस्ते झाल्याचे बतावनी करत असताना स्वतःच्या शेताकडे जाणारे रस्ते यांनी कसे केले याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.
गोलवड वस्ती तसेच ठाकर वस्तीकडे जाणा-या रस्तांबाबद नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे.२००५ साली वाळू लिलावाच्या पोटी महसूल कर भरून हनुमान मंदिरापुढील सभामंडपासाठी ७ लाख रूपये खर्च करून भव्यदिव्य असा सभामंडप उभारला आहे. ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीसाठी कुठल्याही प्रकारचा निधी आलेला नसून याबाबद आपण ग्रामपंचायतीच्या कॅशबुक रेकॉर्ड बघू शकता.तत्कालिन उपसरपंचांनी साडेतीन लाखांच्या पावत्या मोडुन व्यायाम शाळा बांधली पण, आज ती व्यायामशाळा पूर्णपणे मोडकळीस आली आहे तर तेथील साहित्य देखील यांच्याच बगलबच्च्यांची लंपास केल्याचा आरोप देखील या पञकात करण्यात आला आहे.
गावातील मुख्य चौकातील अतिक्रमण हटवुन तेथे बसथांबा करण्याचे आमाचा माणस आहे.तसेच पुढील काळात जिल्हा परिषदेतील 3 वर्गखोल्यासाठी तेथील असणारे वाचनालय इतरत्र हलवून त्या इमारतीचा शाळेच्या वापरासाठी आणण्यात येणार आहे.आमच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा आयएसओ मानांकन प्राप्त झाली झाली तालुक्यात वळण शाळेचे नावलौकिक झाले आहे. पिण्याच्या पाण्याकरिता वाड्या-वस्त्यांवर लोखंडी पाईपलाइन योजना राबवणार आहे.
सांडपाणी वापरासाठी ग्रामपंचायतीत विहिरीवरून जुन्या टाकीपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकणार आहे.तसेच उर्वरित राहिलेले कॉंक्रिटीकरण रस्ते हे लवकरच पूर्ण केले जातील. जुनी झोपडपट्टीचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी पक्के घर बांधणार आहोत. गावात नळाला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
गावात स्ट्रीट लाईट योजना तसेच सर्व समाज बांधवांच्या स्मशानभूमी करीता विशेष योजना राबवणीच्या मानस असल्याचे सदर प्रसिध्दी पञकात म्हटले असुन या पत्रकावर दत्तात्रय नारायण खुळे ,ज्ञानेश्वर बळीराम खुळे, अशोक रामदास कुलट, बाबासाहेब रखमाजी खुळे आदींच्या सह्या आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत