कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरपालिकेचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांताधिक...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरपालिकेचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.
१० वर्षापेक्षा आधिक सार्वजनिक क्षेत्रात कार्य करून स्वच्छता, पशु पक्षी संवर्धन,शासन योजना जागृती,कोरोना काळातील योगदान आदी कार्याबरोबर
भारताचे जलपुरुष व जलसंधारण तज्ञ,रेमन मॅगसेस व पाण्याचे नोबल पुरस्कार विजेते मा.राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाणीपरिषद, जल दिंडी, गोदावरी नदी अविरत व निर्मल ठेवण्याचे कार्य करत आदिनाथ ढाकणे करत असल्याने या कार्याची दखल घेत प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले असून त्यांचे याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत