देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापती व सदस्य पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम - ज्ञानेश्वर ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली विषय समित्या व सभापती पदाची निवड करण्यात आली. सोमवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ देणेत आली होती. त्यानुसार आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करून दुपारी २ नंतर नामनिर्देशन मागे घेणेसाठी १५ मि. चा कालावधी देण्यात आला, पंरतू प्रत्येक समितीसाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने कोणत्याही सदस्याने नामनिर्देशन मागे न घेतल्याने विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
विषय समितीचीं निवड पुढील प्रमाणे :-
*नियोजन व विकास समिती - प्रकाश संसारे (सभापती)* , बाळासाहेब खुरुद,बेबी मुसमाडे,संजय बर्डे, अदिनाथ कराळे सर्व सदस्य.
*अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती - ज्ञानेश्वर वाणी (सभापती)*, बेबी मुसमाडे, कमल सरोदे, उर्मिला शेटे,अंजली कदम सर्व सदस्य.
*पाणीपुरवठा समिती - आण्णासाहेब चोथे (सभापती)*, संगिता चव्हाण , संजय बर्डे, बाळासाहेब खुरुद सुजाता कदम सर्व सदस्य.
*आरोग्य व शिक्षण समिती - सचिन ढुस (सभापती)*, उर्मिला शेटे, अदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे सर्व सदस्य.
*महिला व बालकल्याण समिती - नंदा बनकर (सभापती) उर्मिला शेटे (उपसभापती)*, संगिता चव्हाण, कमलबाई सरोदे, अंजली कदम सर्व सदस्य.
नाराज नगरसेवकांना शेवटक्षणी संधी
देवळाली प्रवरा नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नऊ महिण्यावर येवून ठेपली आहे.गेल्या चार वर्षात जे नगरसेवक नाराज झाले होते. त्यांची नाराजी दुर करण्यासाठी व आगामी निवडणूकीत सक्रीय राहण्यासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांना प्रथमच सभापदी पदाची संधी देण्यात आली. गेल्या वर्षी वाणी सभापदी पद देण्यासाठी नामनिर्देशन पञावर सही मागितली होती. परंतू वाणी नाराज असल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावेळी समित्याच्या निवडणूकीत त्यांची नाराजी दुर करुन बांधकाम समितीच्या सभापती पद देण्यात आले आहे. तर इतर काही नगसेवकांची नाराजी दुर करण्यासाठी समितीत संधी दिली आहे. वाणी यांना विषय समितीचे सभापदी पद देवून खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरसेवक आदिनाथ कराळे यांची मनधरणी करुन आरोग्य व शिक्षण समितीचे सभापदीपद देण्यात येत होते. परंतू सभापदीपद नाकारुन त्यांनी आज नाराज आसल्याचे दाखवून दिले.सभापदीपद देवून मनधरणी करण्यात आलेले नगरसेवक आगामी निवडणूकीत भाजपाला साथ देणार की, ना.प्राजक्त तनपुरे यांचा हात धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत