कोपरगाव(वेबटीम) येवला रोडलगतच्या सर्वे नं.२१० वरील रिझर्वेशनबाबत कोल्हे गट खोटे पत्रक वाटून गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचे कोपरगावचे...
कोपरगाव(वेबटीम)
येवला रोडलगतच्या सर्वे नं.२१० वरील रिझर्वेशनबाबत कोल्हे गट खोटे पत्रक वाटून गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचे कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना वहाडणे म्हणाले की स्व.माधवरावजी आढाव नगराध्यक्ष असतांना दि. १८ जून १९८९ मध्ये विशेष सर्वसाधारण सभेत ही आरक्षणे वगळण्याचा (ठराव क्र.९) झाला होता.
त्यानंतर दि.३ ऑक्टोबर २००१ ला सर्वसाधारण सभेत स.नं. २०५ व २१० वरील आरक्षणे कमी करावीत असा (ठराव क्र.११अ) झाला होता.त्यावेळी नगराध्यक्षा म्हणून सौ.कांचनबाई धनालाल काले पदावर होत्या.
दि.३० ऑक्टोबर २०१० मध्ये अनुक्रम नं.१७ नुसार आरक्षित जमीन खरेदीसाठी खूप मोठी रक्कम लागते व नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सदरची आरक्षणे संपादित करता येणार नाही असाही ठराव झाला.
औरंगाबाद खंडपीठ येथे (रिटपीटीशन नं.9832/2017 व 9833/2017) आरक्षण उठविण्यासाठी दावा दाखल केला होता.खंडपिठाच्या निकालानुसार हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
खोटेनाटे आरोप कराल तर अडचणीत याल याचे भान ठेवा असा इशारा वहाडणे यांनी करून ज्यांच्या काळात आरक्षण वगळण्याचे ठराव झाले त्यांचे वारसदार मात्र भंपकसारखे आरोप करत याहेत हे दुर्दैवी आहे. पोलीस परेड ग्राऊंड व पोलीस स्टेशनच्या जागेबद्दलही आमच्यावर नाहक टिका सुरू आहे. यांना क्रीडांगण व खेळाडूंची खरेच काळजी असती तर कोपरगावचे क्रीडासंकुल संजीवनीवर पळविले गेले तेव्हा का मान खाली घालून गप्प का बसले?का विरोध केला नाही? असा सवाल वहाडणे यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांना खरोखरच क्रीडांगणाची काळजी असेल तर त्यांनी "इनडोअर गेम हॉल" मैदानावरील अतिक्रमणे उठविण्याची लेखी मागणी करावी. मी मात्र ही अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषदेमार्फत नोटिसा बजावल्या आहेत. तुमच्यात आहे का हिंमत? मतांच्या लाचारीमुळे तुमच्यात ती धमक नाही, तुमचा भेकडपणा सर्वजण जाणत असल्याचे वहाडणे यांनी म्हंटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत