कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव तालुका क्रिकेट असोसीएशन व मुंबादेवी तरुण मंडळ,शिवसेना शाखा छत्रपती चौक यांच्यावतीने लक्ष्मी आई स्टेडियम बाजार तळ ...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव तालुका क्रिकेट असोसीएशन व मुंबादेवी तरुण मंडळ,शिवसेना शाखा छत्रपती चौक यांच्यावतीने लक्ष्मी आई स्टेडियम बाजार तळ येथे सेनापती चषक राज्यस्तरीय टेनिसबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला असून असोसीएशनचे संस्थापक अध्यक्ष कै.दीपक माळी यांचे स्मरणार्थ ही स्पर्धा संपन्न होत आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल फंड यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगांव तालुका क्रिकेट असो.चे उपाध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले.सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला असुन कोपरगवातील क्रिकेट रसिकांच्या आग्रहा मुळे ही स्पर्धा या लोकप्रिय मैदानावर प्रथमच भरवित आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष दत्तात्रय काले,मनसेचे संतोष गंगवाल,शिवनारायण परदेशी,भाऊ माळी,बाळासाहेब रुईकर,जालिंदर मुरकुटे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन असो.सचिव मनोज कपोते यांनी केले तर आभार खजिनदार राजेंद्र होन यांनी मानले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी असो.चे सदस्य तुषार विध्दंस,मनोज विसपुते,महेश आमले आदि विशेष परीश्रम घेत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत