देवळाली प्रवरा नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा?

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा गटनेते सचिन ढुस यांनी घेतला असून गुरु...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांचा राजीनामा गटनेते सचिन ढुस यांनी घेतला असून गुरुवारी मुख्याधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात येणार असल्याची माहिती समजते. भावी उपनगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांना गळ घालण्यात आली आहे.परंतु आजही ते तळ्यात-मळ्यात असून चोथे यांनी नकार दिल्यास गटनेते सचिन ढुस उपनगराध्यक्ष पदाची माळ स्वताच्या गळ्यात घालून  घेतील अशी जोरदार चर्चा नगरसेवकांत सुरू असून काही नगरसेवकांनी याबाबत पत्रकारांशी बोलूनही दाखविले आहे. गुरुवारी होणाऱ्या विषयी समिती निवडीमध्ये उपनगराध्यक्ष संसारे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगणार असून विषय समितीच्या सभापतीपदावरून रुसवा-फुगवी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांच्याकडे गटनेते सचिन ढुस यांनी राजीनाम्याची मागणी केली होती. याबाबत नगराध्यक्ष सत्यजीत कदम व भाजप नेते माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्याकडे अनेक दिवसांपासून संसारे यांच्या राजीनामा गटनेते ढुस यांच्यासह काही नगरसेवकांनी केली होती. परंतु माजी आ.कदम यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

  अवघ्या ९ महिन्यांवर देवळाली प्रवरा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली आहे. पुढिल राजकीय धोरणासाठी गटनेते सचिन ढुस यांनी नगरसेवकांतील नाराजी दूर करण्यासाठी प्रकाश संसारे यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा मागून उर्वरित १७ नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाला संधी देण्यासाठी राजीनामा नाट्य घडून आणले आहे.देवळाली प्रवरा नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाची माळ ज्येष्ठ नगरसेवक आण्णासाहेब चोथे यांच्या गळ्यात घालण्यासाठी गटनेते ढुस व काही नगरसेवक गळ घालीत आहे.

ज्येष्ठ नगरसेवक चोथे यांनी ऐनवेळेस उपनगराध्यक्ष पदासाठी नकार दिला तर गटनेते सचिन ढुस उपनगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. परंतु कदम पिता-पुत्रा ऐनवेळी कोणत्या नगरसेवकाच्या झोळीत उपनगराध्यक्षपद पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी दुपारी २ वाजता नगरपालिका सभागृहात विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड होणार असून या निवडीच्या वेळी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा व विषय समिती पदावरून रुसवे-फुगवे होण्याची शक्यता वर्तविली जात असून यावर कदम पिता-पुत्रासह गटनेते सचिन ढुस काय भूमिका  घेतात याकडे सर्वांचे लग लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत