कोपरगाव शहरातील काही नागरिकांवरच अन्याय का?-निसार शेख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरातील काही नागरिकांवरच अन्याय का?-निसार शेख

  कोपरगाव प्रतिनिधी पाणी संदर्भात विविध प्रश्नांवर, विविध भागातील नागरिकांनी भूमीपुत्र  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसारभाई शेख यांच्या नेत...

 कोपरगाव प्रतिनिधी

पाणी संदर्भात विविध प्रश्नांवर, विविध भागातील नागरिकांनी भूमीपुत्र  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निसारभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


यावर्षी संपूर्ण राज्यात सर्व ठिकाणी पाऊस बऱ्या पैकी आणि समाधान कारक झालेला असून नदी-नाले ओढे तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील कोपरगांव करांच दुर्दैव म्हणावे की ,ऐन हिवाळ्यात तब्बल आठ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे.

कोपरगावचा बराच भाग हा स्लम एरिया असल्याकारणाने या ठिकाणची जनता हातमजूर आहे.ज्या दिवशी या भागात पाणी सोडले जाते त्या वेळेस या भागातील तमाम महिला मजुरांना आपला रोजगार बुडून पाण्याची वाट बघत बसावं लागतं.पाणी साठवण्यासाठी पुरेशी सामग्री नसल्या कारणाने अतोनात हाल होतात.

आठ दिवसासाठी पाणी पुरवठा साठवण करणे शक्य होत नाही.आणि दुसरी शोकांतीका अशी की शहरातील या स्लम भागात फक्त आर्धा पाऊण तासच पाणी दिल जातं.आणि शहरातील इतर ठिकाणी दिवस दिवस भर पाणी चालू असतं हा नागरिकांशी केलेला दुजाभाव नाही का या सर्व विषयावर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  यांच्या बरोबर सर्व भागातील नागरिकांनी सविस्तर चर्चा करत आपली व्यथा मांडली.

या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन नगरपालिका प्रशासनाने न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत