उंबरे गावच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी, या पराभवाने खचून न जाता मला 251 लोकांनी आपल्या पवित्र मताव्दांरे दिलेल्या आशीर्वादा...
उंबरे गावच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी, या पराभवाने खचून न जाता मला 251 लोकांनी आपल्या पवित्र मताव्दांरे दिलेल्या आशीर्वादाची प्रेरणा घेवून मी माझे कार्य अविरतपणे सुरूच ठेवणार आहे. भविष्यात सत्ता असो किंवा नसो, मी माझ्या प्रभागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून, त्याव्दारे मी स्वतःला सिद्ध करेल, असा विश्वास सौ. सोनाली गोरक्षनाथ शेजूळ यांनी व्यक्त केला.
सोनाली शेजूळ म्हणाल्या, उंबरे गावातील प्रतिष्ठेच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये काही मतांनी आपला पराभव झाला असला तरी आपण खचून गेलेलो नाही. उलट आमच्या कुटूंबावर 47 टक्के जनतेने विश्वास दर्शवला आहे. विजयात आम्हाला यश आले नाही, मात्र तब्बल 251 मतदारांनी आमच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तसेच कोणताही स्वार्थ न ठेवता आपले बहुमोल मतं देवून पाठबळ दिले आहे. त्यामुळे खरोखरच जनतेचे आभार मानावे तितके थोडे आहेत. आमच्या विजयासाठी मंडळाचे नेते, कार्यकर्ते आणि तरूण वर्गाने मोठे परिश्रम घेतले. दुर्दैवाने त्यात यश आले नसले तरी आपण सर्वांनी घेतले परिश्रम नक्कीच आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही.
आता काम करण्यासाठी पद किंवा सत्ता असावी लागतेचं असे नाही, त्यामुळे आमचे शेजूळ कुटूंब सर्वसामान्य जनतेसाठी हाकेला धावण्याचे काम करणार आहे. गावातील घरकुल योजना असो किंवा अन्य लाभाच्या योजना जनतेपर्यंत्त पोहचविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. प्रभागातील पाणीप्रश्नासह अन्य प्रश्न सोडविण्यासाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. वेळप्रसंगी विरोधकाची भूमिका बजावू पण जनतेला वार्यावर सोडणार नाही. जनतेने आम्हाला भरभरून मते टाकली आहेत. त्यामुळे हीच मतांची टक्केवारी पुढील पाच वर्षात आम्ही 251 वरून 500 पर्यंत्त नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आपल्या आशीवार्दांचे बळ या कार्यात आम्हाला पाठबळ देईल, असा विश्वासही शेजूळ यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत