कोपरगाव(प्रतिनिधी) अध्यात्माच्या वाटेवर जवळपास ६० वर्षापासुन दिपस्तंभाप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्याल...
कोपरगाव(प्रतिनिधी)
अध्यात्माच्या वाटेवर जवळपास ६० वर्षापासुन दिपस्तंभाप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आंध्रप्रदेश व महाराष्ट्र संचालिका राजयोगिनी ब्रम्हकुमारी संतोष दिदी या मानवतेला पडलेले सुवर्ण स्वप्न आहे. ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला "स्व" ची जाणी करुन देण्याचे व्रतविधान घेवुन ब्रम्हकुमारी संस्थेमधुन दीदी नी अर्पण केलेली आध्यात्मिक सेवा ब्रम्हकुमारी संस्थेचे सर्वच्य मुल्य ठरले आहे. तसेच ३० वर्षापासुन त्या महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , तेलंगाणा, येथील झोनल इनचार्ज म्हणून कार्यरत आहे. नुकतीच त्यांना गोवा राज्याकडुन ग्लोबल कौसिल फाॕर प्रोफेशनल एज्युकेशन मिशन च्या माध्यमातून त्यांच्या कार्याला साजेशी अध्यात्माची डाॕक्टरेट ही पदवी देवुन गौरव करण्यात आला.
अध्यात्मिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेशध्यक्ष वसंतराव मुंडे साहेब व प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
पञकार संघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.मनिष जाधव, शहरध्यक्ष श्री.हफीजभाई शेख, तालुका सचिव विनोद जवरे, तालुक सह-सचिव विजय कापसे, तालुक सह-सचिव अनिल दिक्षीत त्याचबरोबर राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे , आयुर्वेदाचार्य डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या प्रमख उपस्थितीत राजयोगिनी ब्रम्हकुमारी संतोष दिदी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने सन्मानपञ देवुन गौरव करण्यात आला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत