राहुरी(वेबटीम) अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद भेट देऊन कामांचा आढावा घेत पालिकेने राबवलेल्...
राहुरी(वेबटीम)
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषद भेट देऊन कामांचा आढावा घेत पालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून पालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे भेट दिली. देवळाली पालिकेने राबवलेल्या विविध कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रथम देवळाली प्रवरा शहरामध्ये व परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या व ओढे खोलीकरण व रुंदीकरणच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पालिकेने राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.
नगर परिषदेच्या कार्यालयात विविध विकास कामांचा आढावा घेतला व रखडलेल्या अनेक अनेक कामांच्या त्रुटी वर पर्याय काढून त्या कामाचा मंजुरी देण्यात संदर्भात सकारात्मकता दर्शवली.जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी पालिकेने राबवलेल्या अनेक योजनांबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी शिर्डी संस्थान चे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम , देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम ,उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे ,गटनेते सचिन ढुस नगरसेवक बाळासाहेब खुरुद , मुख्याधिकारी अजित निकत व सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी जिल्हाधिकारी भोसले यांचा सन्मान केला. देवळाली नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी जिल्हाधिकारी भोसले यांचा सन्मान केला.
यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार ,अनिल पवार, तहसीलदार एफ.आर.शेख आदी देवळाली प्रवराचे तलाठी साळवे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत