राहूरी(वेबटीम) संजवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती प्रगतशिल शेतकरी कृषीरत्न पुरस्कार राह...
राहूरी(वेबटीम)
संजवनी शेती व शिक्षण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती प्रगतशिल शेतकरी कृषीरत्न पुरस्कार राहुरी तालुक्यातील बाभुळगांवचे प्रगतशिल शेतकरी ह.भ.प. पंढरीनाथ भिवाजी पाटोळे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
संगमनेर येथील मालपाणी लॉन्स या ठिकाणी संजवनी शेती व शिक्षण विकास संस्था आयोजित शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन मा.राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित व विधानसभेचे हंगामी अध्यक्ष व तथा उपाध्यक्ष ना. नरहरी झीरवाळ व आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते ह.भ.प. पंढरीनाथ भिवाजी पाटोळे शिवछत्रपती प्रगतशिल शेतकरी कृषीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ नाशिक पदवीधर डॉ. सुधीर तांबे, पद्मश्री राहीबाई पोपरे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ह.भ.प. पाटोळे यांनी केलेल्या शेती, समाजकारण, राजकारण या कार्याची दखल घेऊन कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पाटोळे यांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रामधून अभिनंदन करण्यात येत आहे. राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत