माकडाच्या गोष्टी सांगून जनतेची करमणूक करू नका..., - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माकडाच्या गोष्टी सांगून जनतेची करमणूक करू नका...,

कोपरगाव(वेबटीम) अर्थसंकल्पात नगरसेवकांना फक्त सूचना व हरकती मांडण्याचा  अधिकार असतो अर्थसंकल्प मंजूर नामंजूर करणे हा विषय येत नाही  हे पुन्ह...

कोपरगाव(वेबटीम)

अर्थसंकल्पात नगरसेवकांना फक्त सूचना व हरकती मांडण्याचा  अधिकार असतो अर्थसंकल्प मंजूर नामंजूर करणे हा विषय येत नाही  हे पुन्हा एकदा कोणीतरी आपल्या बालिश नगरसेवकांना सांगण्याची गरज आहे.माकडाच्या गोष्टी सांगून जनतेची करमणूक करू नये.तुमच्या कथा तुमच्या जवळच ठेवा कामा येतील लहान मुलांना सांगायला जग कोणत्या दिशेला चालले आणि आम्ही अजूनही माकडाच्या गोष्टी सांगून मनोरंजन करत असल्याची  उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांच्यावर टीका करणारी पोस्ट आज पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटातून सोशल मीडियावर व्हायरल झाली असून काल पोपट तर आज माकड अशी उपमा या पोस्टमध्ये दिल्याने कोपरगावात राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोपरगावच्या जनतेने तुम्हाला विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे भाटाच्या कथा सांगणे बंद करा आणि कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी काय करता येईल हे बघा. होय, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आटापिटा आहे पण तो विकासकामांसाठी ! कोपरगावच्या उपनगराध्यक्षांनी जनतेसमोर नवीन आदर्श ठेवलाय, भाटाच्या कथा सांगण्याचा  असेही पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

उपनगराध्यक्षांनी आपले काम आधी समजून घ्यावे. पाशवी बहुमताच्या जोरावर सभेत आरडाओरडा करून विकासकामे नामंजूर करणे म्हणजे बहादुरी नाही. मलिदा कोण खातंय आणि भ्रष्टाचारी कोण आहे हे जनतेला माहीत आहे. ते तुम्ही सांगण्याची गरज नाही. आपण  उपनगराध्यक्ष आहात याचे भान ठेवून राजकीय सुडबुद्धी बाजूला ठेऊन विकासकामावर लक्ष द्या. जनतेला विकास हवा आहे. करमणूक करायचं बंद करा  असेही या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत