कोल्हेंंवर बोलण्याचा अधिकार नाही, तुमची तर गल्लीत पात्रता नाही... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हेंंवर बोलण्याचा अधिकार नाही, तुमची तर गल्लीत पात्रता नाही...

 कोपरगाव(वेबटीम ) कोल्हे कुटूंबावर तूम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नसून तुमची तुमच्या गल्लीत पात्रता नसल्याची टीका भाजपचे जिल्हा सचिव कैलास ...

 कोपरगाव(वेबटीम)

कोल्हे कुटूंबावर तूम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नसून तुमची तुमच्या गल्लीत पात्रता नसल्याची टीका भाजपचे जिल्हा सचिव कैलास खैरे यांनी भाजप नेते सुभाष शिंदे यांच्यावर केली.

 गेल्या दोन दिवसांपूर्वी सुभाष शिंदे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर टीका केली होती त्यास प्रतिउत्तर म्हणून कैलास खैरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

 खैरे यांनी म्हंटले की, गेले दोन तीन वर्षापासून तुम्ही ज्या काही बातम्या देतात त्या वाचल्या नंतर आणि तुमचे वर्तन बघितल्या नंतर हे सर्व शब्द केवळ तुमच्या बाबतीत म्हणण्यापुरते आहेत असेच वाटते.फक्त कमाई करण्याचा सोयीस्कर मार्ग म्हणून या पेशाचा तुम्ही वापर केला हे कोपरगाव शहरातील जनतेला माहीत आहे.

तुम्ही कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असे कधीही दिसले नाही आणि एकही विद्यार्थी तुमचे आज अखेर चुकून नावही घेत नाही...यातच तुम्ही किती विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष  होतात हे दिसून येते.

दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही एक बातमी दिली. अर्धवट माहितीच्या आधारे अर्धवट राजकिय ज्ञानाने सहकार क्षेत्रावर तुम्ही आरोप करत सुटलात आणि थेट राजकिय नेते होण्याच्या भानगडीत पडुन तोंडाला येईल ती गरळ ओकत सुटलात असे बहुतेक वेळा जनतेने पाहिले आणि ऐकले आहे.तुमचा कधीही न वापरलेला मेंदू हा थेट सहकार क्षेत्रावर टीका करण्या इतका मोठा कधी झाला? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला.

ज्या सहकार क्षेत्रावर तुम्ही टीका करतात त्या चळवळीला आपल्या कोपरगाव तालुक्यात जिवंत ठेऊन हजारो कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याचे कार्य आदरणीय श्री.शंकररावजी कोल्हे साहेब आणि आदरणीय स्व.शंकररावजी काळे साहेब यांनी केले आहे. या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सहकार क्षेत्राला नवी उंची मिळवून दिली हे सर्व महाराष्ट्र जाणतो.

आपल्याकडील या सहकार क्षेत्रामुळे कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलते हे काही सुज्ञास सांगण्याची गरज नाही. या गोष्टीची पावती म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनीही आदरणीय श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव केलेला आहे. ज्या आदरणीय कोल्हे कुटूंबावर तुम्ही गरळ ओकतात त्या कुटूंबाच्या सामाजिक योगदानाची आणि तुमची कधीच बरोबरी होऊ शकत नाही.कारण विद्यार्थ्यांना अर्धवट शिकवून संस्थेकडून प्रत्येक महिन्याला पगार काढणारे तुम्ही होतात याचाच अर्थ स्वतः काहीही काम न करता संस्थेकडून मोफत पगार लाटणे हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे हे तुम्ही विसरून गेलात.तुमचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांनाच चांगलेच ठाऊक आहे.असे म्हणतात एखादा डॉक्टर चुकला तर एक रुग्ण दगावतो...न्यायालयाचा निर्णय चुकला तर एखादे व्यक्तीचे नुकसान होते पण शिक्षक चुकला तर एका पिढीचे नुकसान होते असे खैरे यांनी म्हंटले आहे.

ज्या आदरणीय कोल्हे कुटूंबावर तुम्ही टीका करतात तर याचे जरा भान बाळगा की या कुटूंबावर तुम्ही कितीही टीका केली तरीही काहीच फरक पडणार नाही कारण तुमच्या सारखे भुंकणारे खूप येतात खूप जातात पण जनतेच्या ह्रुदयात या कुटूंबाबद्दल प्रेम आहे,आदराचे स्थान आहे.

ग्रामीण भागातील मूले मुली शिकली पाहिजे यासाठी कोल्हे साहेबांनी शैक्षणिक संकुल उभे केले.या संकुलातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेतले व ते आज स्वतःच्या पायावर उभे आहेत...गोर गरिबांना रोजगार मिळावा यासाठी सहकार जिवंत ठेवला,अनेक संस्थांच्या माध्यमातून गोर-गरिबांची मूले रोजगाराला लावली...विशेष म्हणजे एक रुपयाही नोकरीला लावण्यासाठी न घेता अनेकांना नोकऱ्या लावून देणारे कोल्हे साहेब आहेत तेव्हा या कुटूंबावर तूम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुमची तुमच्या गल्लीत पात्रता नाही.

त्यामुळे तुमचे हे बोलणे हस्यास्पद वाटते.तुम्ही तुमच्या पेशाला काळिमा फासला म्हणून आम्हीही आमचे संस्कार सोडुन तुम्हाला तुमच्या भाषेत खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे आम्हाला मान्य नाही.. कारण आमच्यावर आमच्या आदर्श शिक्षकांनी चांगले संस्कार केलेले आहेत. वयाच्या ९२ वर्षीही आदरणीय श्री.शंकररावजी कोल्हे साहेब हे संजीवनी उद्योग समूहाला रोज न चुकता जातात.कामकाजाची माहिती घेतात.यातच त्यांची कामकाजाबद्दलची तळमळ दिसून येते, असे खैरे यांनी म्हणून आमच्या माहिती प्रमाणे जेव्हा तुम्ही नोकरीतून निवृत्त झाल्या नंतर शेवटची निवृत्तीची मोठी रक्कम काढुन आणल्या नंतर तुम्ही त्या संस्थेकडे ढुंकूनही बघितले नाही.त्या संस्थेचे उत्तरदायित्व म्हणून पुन्हा आपण बघायलाही गेला नाहीत असे तुमचे सहकारी सांगत असल्याचे कैलास खैरे यांनी म्हंटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत