कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील गावठाण भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी रोडचा एकेरी उल्लेख काढुन सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महारा...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गावठाण भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी रोडचा एकेरी उल्लेख काढुन सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज रोड असा करण्यात यावा अशी मागणी सागर लकारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवेदन कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले.
या निवेदनात पुढे म्हंटले की, पुढिल काळात नगरपरिषदेच्या घरपट्टी , नळपट्टी , लाईट बिलावर, शासकीय कागदपत्रावर देखीलछत्रपती शिवाजी महाराज रोड असा उल्लेख करण्यात यावा. याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज रोड प्रवेशद्वारचे आर.सी.सी बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी. अशा आशयाचे निवेदन स्थानिक रहिवाशी व व्यापारी बांधवांच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदन उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांनी स्वीकारले.
यावेळी सागर लकारे , मोंटु लोंगाणी, राहुल देवळालीकर, संतोष शेलार, राहुल पवार, हृषीकेश खैरनार, आकाश हलवाई, प्रसाद रुईकर, सुदर्शन वाघचौरे, रिंकु खडांगळे, आसिफ रंगरेज, विकी वर्मा, ओम बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत