देवळाली प्रवरात स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब

देवळाली प्रवरा(वेबटीम)  देवळाली प्रवरा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये तुंबलेल्या गटारी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफ केल्या जात नस...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

 देवळाली प्रवरा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये तुंबलेल्या गटारी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफ केल्या जात नसून नागरिकांना या गटारी साफ करण्याची वेळ आली आहे. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

 देवळाली प्रवरा शहरातील नविनशेठ मुथा यांच्या दुकानामागे नागरी वसाहत आहे. या ठिकाणी असणाऱ्या गटारी पूर्णपणे तुंबलेल्या आहेत. नगरपालिका स्वच्छता विभागाचे कर्मचारी या गटारी साफ करण्यास येत नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही नाली स्वच्छता केली जात नाही.

 तुंबलेल्या गटारीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असतानाही स्वच्छता होत नसल्याने या भागातील नागरिक आरोग्याची काळजी म्हणून स्वतः तुंबलेल्या नाल्या साफ सफाई करत आहे.

 नगरपालिका पाणी पट्टी व घर पट्टी वसुली करण्यात नेहमी अग्रेसर भूमिका घेते नागरिकांच्या आरोग्याशी निगडित स्वच्छता प्रश्नी दुर्लक्ष का करते? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

 स्वच्छता सर्व्हेक्षण २०२१ अभियान देवळाली प्रवरा नगरपालिकेकडून राबविले जात असताना शहरात स्वच्छतेच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब पहावसाय मिळत आहे.  या भागातील तुंबलेल्या गटारी दररोज साफ न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत