कोल्हे यांना जीवननगौरव तर स्व. काळे यांना मरणोत्तर जिवनगौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हे यांना जीवननगौरव तर स्व. काळे यांना मरणोत्तर जिवनगौरव

कोपरगाव (वेबटीम) येथील कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच य...

कोपरगाव (वेबटीम)

येथील कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार यंदाच्या वर्षात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना राज्यस्तरीय 'जीवन गौरव पुरस्कार' तर माजी मंत्री कर्मवीर स्व. शंकरराव काळे यांना राज्यस्तरीय 'मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार' तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहमदनगर येथील जेष्ठ पत्रकार सुधीर लंके यांना राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकारिता पुरस्कार' जाहीर करण्यात आले, असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे यांनी दिली आहे.

  कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाची गेल्या १३  वर्षापासून पुरस्कार वितरणाची परंपरा कायम राखली आहे. या संघाच्या माध्यमातून आजवर अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. यंदाचे पुरस्कार देण्यासाठी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने वरील मान्यवरांना पुरस्कार देण्यासंदर्भात एक मताने निर्णय घेतला. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुढील काही दिवसात मंत्री महोदयांच्या व साधुसंताच्या उपस्थितीत थाटामाटात करण्यात येणार असल्याचेही डॉ. अरुण गव्हाणे यांनी सांगितले आहे.

यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, खजिनदार सिद्धार्थ मेहरखांब ,संघटक दिलीप दुशिंग, भागा वरखडे, प्रा साहेबराव दवंगे, किरण नाईक, प्रा.डॅा. एस. आर. बखळे, सचिन धर्मापुरीकर, नानासाहेब शेळके, रोहीत टेके, सोमनाथ सोनपसारे, रफीक रंगरेज, लक्ष्मण वावरे, योगेश डोखे, मोबीन खान, संतोष देशमुख, लक्ष्मण जावळे, राहुल देवरे, शिवाजी जाधव, अक्षय खरात, नितीन जाधव, विजय शेळके, राजेंद्र गाडे, निवृत्ती शिंदे, हेमचंद्र भवर, दत्तात्रय गायकवाड,  गोरख वर्पे, पुंडलीक नवघरे, काकासाहेब खर्डे, शाम गवंडी, योगेश रुईकर, संजय लाड, संजय भवर, बिपीन गायकवाड आदी यावेळी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत