कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी लगेचच मटका अड्ड्यावर छापा टाकला. त्यांच्य...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी लगेचच मटका अड्ड्यावर छापा टाकला. त्यांच्या या कारवाईचे शहरातून कौतुक होत आहे. मात्र गुन्हेगारीवर हा वचक कायम रहावा अशी अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.
दि.२४ फेब्रुवारी रोजी ७.३५ वा.चे सुमारास धारणगांव रोड लगत असणारे दोन नंबरचे गाळयात एजाज निसार शेख वय ३० रा.वैष्णोदेवी मंदीराजवळ गांधीनगर कोपरगांव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका चालवत होता त्याचा कडून ५५० रु.रोख व जुगाराचे साहित्य, १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं ६२/२०२१ मुंजुकाक.१२ (अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.
तसेच दि २४ फेब्रुवारी रोजी ९.१० वा.चे सुमारास खुले नाटयगृहाजवळ असणारे गाळयात इसम नामे समीर हारुण सैय्यद वय २८ वर्षे रा.मक्का मजिदजवळ गांधीनगर कोपरगाव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका ७०० रु.रोख व जुगाराचे साहित्य, १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आलेने सदर आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं ६३ /२०२१ मुंजुकाक.१२ (अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.
तसेच दि २५ फेब्रुवारी रोजी ६.३० वा.चे सुमारास ,एस.टी. स्टॅण्ड ते अण्णाभाऊ साठे पुतळयाकडे जाणारे रोडचे पश्चीमेस असणारे गाळयाचे मागील बाजुस मोकळया भागात या ठिकाणी ईसम नामे संतोष सिताराम तांबे वय ३१ वर्षे मारुती मंदीराजवळ गांधीनगर कोपरगांव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका ११०० रु.रोख व जुगाराचे साहित्य, १ ते १० अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आलेने सदर आरोपी कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं ६४/२०२१ मु.जु.का.क.१२(अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.
सदरची कार्यवाही पो.नि.वासुदेव देसले यांना गुप्त बातमी दारामार्फत मिळालेल्या बातमी वरुन कोपरगांव शहर पो.स्टे.चे स.फौ.एस.जी. ससाणे. पोकॉ.आर.जी.खारतोडे, स.फौ.एस.सी.पवार, पोना. बी.एसकोरेकर,पोहेकॉ.ङि आर.तिकोणे यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत