आरडगाव शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगाव शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या

आरडगाव(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव शिवारात मुळा डाव्या कॅनॉलमध्ये मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला आहे. शुक्रवार ५ फेेेब...

आरडगाव(वेबटीम) 

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव शिवारात मुळा डाव्या कॅनॉलमध्ये मृतावस्थेत एक बिबट्या आढळून आला आहे.

शुक्रवार ५ फेेेब्रुवारी रोजी सकाळी डाव्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये हा मृत बिबट्या तरंगताना येथील नागरिकांनी पाहिला तो मृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा मृत बिबट्यास वर काढण्यात आले.

सदर बिबट्याचा बघण्यासाठी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. हा बिबट्या पाण्यात पडून मृत्यू झाला की अन्य कुठल्या कारणाने हे मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत