राहुरीत महावितरणाविरोधात भाजपचे आंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत महावितरणाविरोधात भाजपचे आंदोलन

  राहुरी(वेबटीम) महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकल्याचा आरोप कर...

 राहुरी(वेबटीम)

महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकल्याचा आरोप करत महावितरणच्या निषेधार्थ राहुरी तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आल. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरण चे कार्यकारी अभियंता धिरज गायकवाड ,पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याकडे देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने महावितरण शेती वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.परंतु सर्व शेतकरी कोरणामुळे अडचणीत आहेत तसंच अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठा नुस्कान झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वीज भरण्यास त्रास देऊ नये आणि वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम तात्काळ थांबवावी.अन्यथा आगामी काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे,रविंद्र म्हसे,सुभाष गायकवाड,राजेंद्र उंडे,शहाजी ठाकुर,भैय्या शेळके,सुरेश बानकर,नंदकुमार डोळस,युवराज पवार, नानासाहेब गागरे,नारायण धोंडगे, सचिन मेहेत्रे, संदीप नेहे, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब गाडे,आदित्य दहिफळे,प्रभाकर हरिचंद्र, दिपक वाबळे, विक्रम गाडे,राजेंद्र चोपडे , रघुनाथ पवार, योगेश गीते, रामभाऊ मुंडे, दीपक दायमा, नानासाहेब पवार रंगनाथ पवार आदिंसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत