आर्यन कदमला सुवर्ण तर अर्णवला रजतपदक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आर्यन कदमला सुवर्ण तर अर्णवला रजतपदक

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुका देवळाली प्रवरा येथील भूमीपुत्र व पुणे येथील राजपथ कंपनीचे मालक व दौंड शुगरचे चेअरमन जगदिश आण्णासाहेब ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुका देवळाली प्रवरा येथील भूमीपुत्र व पुणे येथील राजपथ कंपनीचे मालक व दौंड शुगरचे चेअरमन जगदिश आण्णासाहेब कदम यांचे सुपूत्र आर्यन कदम यांना २०० मीटर ज्युनिअर गटाच्या राज्य अँथेलँटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक तर अर्णव कदम यांस यांना रजत पदक मिळाले. आर्यन कदम यास २० वर्षाखालील गटातून २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळाले तर अर्णव कदम यास रजतपद मिळाले.

 या दोघांनाही लहानपणापासून  खेळाची आवड आहे. भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात या स्पर्धा घेण्यात आल्या.१८ वर्षाखालील २०० मीटर धावणे गटात आर्यन कदम याने २२.२८ सेकंदात हे अंतर पार करून विक्रम केला. या दोन्ही  बंधूंना वडील उद्योजक जगदीश कदम व आई सौ.मोहिनी कदम यांचे मार्गदर्शन लाभले. ते दोघे जगदीश कदम यांचे सुपुत्र असून देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती सुनील कदम यांचे पुतणे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत