देवळाली प्रवरात शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोर...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँगेस कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण व काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे यांनी दिली.

  शहरातील काकासाहेब चौकातील हनुमान मंदिर परिसरात शनिवार ६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या काँगेस मेळाव्यास आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे मार्गदर्शन करणार असून यावेळी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँगेसचे महासचिव करण ससाणे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, सभापती सचिन गुजर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, निरीक्षक संजय पोटे, अमृतराव धुमाळ आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.

 या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते व हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, कार्याध्यक्ष कृष्णाराव मुसमाडे, युवकचे शहराध्यक्ष कुणाल पाटील, महिला आघाडी अध्यक्षा भाग्यश्री कदम,वैभव गिरमे, गंगाधर गायकवाड,डाॅ.फिरोज शेख तसेच काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी व महिला आघाडी कमिटी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत