राहूरी(वेबटीम) पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी राहूरी येथे शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करून केंद्रा...
राहूरी(वेबटीम)
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी राहूरी येथे शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करावी या मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहूरी येथील बाजार समिती समोर राहूरी तालुका युवा सेना प्रमुख गणेश खेवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले. प्रसंगी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात युवा सेना तालुका प्रमुख, बाजार समिती उपसभापती तथा देसवंडीचे सरपंच गणेश खेवरे , जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब मुसमाडे , भागवत मुंगसे, शहरप्रमुख संतोष येवले ,कैलास शेळके,हमीद पटेल,राहुल चोथे,सुनील शेलार,पोपट शिरसाठ ,भगीरथ पवार,बाळासाहेब शिंदे ,लखन बोरुडे,अविनाश पेरणे भाऊ खेवरे,रमेश कोकाटे ,विलास जाधव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत