कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रकाश त्र्यंबक कोपरे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी गुरुवार दि ४ फेब्रु...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रकाश त्र्यंबक कोपरे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी गुरुवार दि ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार असू पत्रकार स्वप्नील कोपरे यांचे वडील होते.
कोपरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीला वाहून घेतले होते.केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले यांचे खंदे समर्थक म्हणून ते प्रचलित होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना रस्ता रोको, दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन , अशा विविध प्रकारचे आंदोलन केले. त्याच बरोबर खासदार आठवले यांच्या प्रगतीत कोपरगावकरचा सिंहाचा वाटा असून त्यामध्ये अग्रेसर प्रकाश कोपरे यांचे नाव घेतले जाते. कोपरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कारानी कोपरे यांचा गौरव झाला होता असाच सन्मान कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेने २०१६ साली 'समाजभूषण' या पुरस्काराने गौरव केला होता. कोपरे यांच्या जाण्याने आंबेडकर चळवळीत शोककळा पसरली आहे. ओम साई शिक्षण संस्थेचे संस्थापक परशराम साबळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मनीष जाधव आदींनी शोक व्यक्त केला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत