नगराध्यक्ष वहाडणे यांनी घेतले कोल्हे गटाच्या नगरसेवकांवर तोंडसुख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगराध्यक्ष वहाडणे यांनी घेतले कोल्हे गटाच्या नगरसेवकांवर तोंडसुख

  कोपरगाव प्रतिनिधी  नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज  आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.  वहाडणे य...

 कोपरगाव प्रतिनिधी

 नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज  आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

 वहाडणे यांनी पूढे म्हंटले की,  कोणत्याच नगरसेवकांची नावे घेऊन बोलणार नव्हतो परंतु मागील सभेमध्ये उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक रविंद्र पाठक, योगेश बागुल, अनिल आव्हाड यांनी आव्हान केले होते की स्पष्टपणे नाव घेऊन बोला त्याच अनुषंगाने आज मी जाहीर करू इच्छितो की,कैलास जाधव यांनी क्रीडांगण आरक्षण उठविण्यात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता.तर यावर मी जाधव यांना सांगू इच्छितो की,  ते आर्थिक उलाढाल करणारे कोण लोक आहे त्यांची नावे जाहीर करत त्यांचा विरुद्ध कायद्याने गुन्हे दाखल करावे जेणेकरून त्यातुन जनते समोर सत्य तरी बाहेर येईल. जाधव यांचे साई कॉर्नर जवळील सर्व्हिस स्टेशनचे अतिक्रमण काढून घ्यावे ही त्यांचाच पक्षाच्या नगरसेवकांची इच्छा आहे. कोल्हे परिवाराला कोणत्याही प्रकारे शहर विकासाचे आणि शहरातील खेळाडूचे काही देणे घेणे नसून आणि जर तसे असते तर त्यांनी क्रीडांगण शहरा पासून लांब  आपल्या शिक्षण संस्थेत नसते नेले, किंवा गिरमे यांचे मैदान खरेदी करण्यासाठी कोल्हे गटाचे सावकार वारंवार गिरमे यांना त्रास देण्यासाठी गेले नसते किंवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करता म्हणून त्रास दिला जातोय की काय? ही पण शंका उपस्थित राहते.

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचे निकटवर्तीय पप्पू पडियार यांच्याच्या आडमुठेपणा मुळे देखील अनेक त्यांचे निकटवर्तीय दूर गेले आहे तर सातभाई यांना शहराचे काही देणे घेणे नसून त्यांना फक्त त्यांचा प्रभाग आणि गल्लीच्या विकासाची काळजी आहे.

 उपनगराध्यक्ष निखाडे यांनी विजय कन्स्ट्रक्शन कडून कामाचे बिल काढण्याचा बदल्यात दीड लाख  रुपये घेतले होते यावर विवेक कोल्हे यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली होती परंतु त्यानंतर त्यांचाच  गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ घातली. का कुणास ठाऊक का ते? काही दिवसांपूर्वी मी विजय कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारास मी अपूर्ण कामे पूर्ण कसरण्यास सांगितले व नाही झाली तर  कोल्हे गट  गोंधळ घालेल तर यावर ठेकेदारकडून उत्तर मिळाले की त्यांचा नेत्याकडून त्यांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. तेव्हा त्यांची काळजी तुम्ही नका करू असे उत्तर दिले आता यावर काय म्हणायचे? माजी नगराध्यक्ष विजय वाजे यांनी भावसार यांच्या नावावर नगरपालिकेचे काम घेत ते पूर्ण केले त्या कामाचे बिल काढण्यासाठी अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे चकरा मारल्या परंतु मी देखील ते काम पूर्ण झाले की नाही याची खात्री करूनच बिल काढले. 

तसेच काही दिवसांपूर्वी वाजे यांनी नगरपालिकेच्या एका जबाबदार अधिकाऱ्यास अरेरावीची भाषा वापरली होती. यावर सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते.परंतु यावर  नगरसेवक रविंद्र पाठक यांनी वाजे यांच्यावतीने माफी मागत विषय मिटता घेतला होता, अशी माहिती नगराध्यक्ष वाहडणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत